(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी !’

नाशिक – सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी या मागणीचा ठराव ‘ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन’च्या (एआयएस्एफ्) जिल्हास्तरीय अधिवेशनात मांडण्यात आल्याचे समजते. येथील द्वारका परिसरातील वीज वर्कर्स पतसंस्थेच्या सभागृहात हे अधिवेशन झाले. या वेळी अधिवेशनासाठी राज्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पंकज चव्हाण, राज्य उपाध्यक्ष शंबुक संकल्पना उदय, शिक्षण अभ्यासक डॉ. मिलिंद वाघ, राजू देसले, महादेव खुडे आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांवर लादण्यात येणार्‍या डीबीटीच्या निर्णयास ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या (एआयएस्एफ्) जिल्हास्तरीय अधिवेशनात कडाडून विरोध दर्शवण्यात आला. याशिवाय दिल्लीमध्ये संविधान जाळण्याच्या झालेल्या प्रयत्नांच्या निषेधासह मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेचा निषेध आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी या मागणीसह चार प्रमुख ठराव संघटनेच्या अधिवेशनात मांडण्यात आले. (नक्षल समर्थकांना मानवाधिकाराचे कार्यकर्ते समजणार्‍यांची वैचारिक पातळी किती खुजी आहे, हे यावरून लक्षात येते. अशांना सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्याची तरी पात्रता आहे का ? – संपादक) ‘वर्तमानात संविधानिक मूल्यांना लक्ष्य केले जात आहे. या मूल्यांच्या रक्षणासाठी सजग होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने योगदान द्यावे’, असे आवाहन मार्गदर्शक पंकज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात