(म्हणे) ‘पुरोगाम्यांच्या हत्या घडवण्यात सनातन संस्थेचा हात असल्याने तिच्यावर बंदी घालावी !’

पाटण येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा कांगावा !

आतंकवादविरोधी पथक आणि अन्वेषण यंत्रणा यांनी आतापर्यंत केलेल्या अन्वेषणात सनातन संस्थेचा संबंध असल्याचे सांगितलेले नाही. असे असतांना अशी विधाने करणे म्हणजे रिपब्लिकन पक्षाला अधिक कळते असे म्हणायचे का ?

सातारा – देशातील थोर विचावंतांचा नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा हेतू धरून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ते मागे घेण्यात यावेत. महाराष्ट्रात ज्येष्ठ पुरोगामी विचारवंतांच्या हत्या होत आहेत. त्या घडवून आणण्यात सनातन संस्थेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सनातन संस्था आणि संबंधित यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सहकारी संघटनांच्या वतीने पाटण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. (केवळ संशयावरून सनातनवर बंदीची मागणी करणारे भारतीय राज्यघटनेची मानहानी करत आहेत, असे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक)

पाटण तहसील कार्यालयावर संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देहली येथे संविधानाची प्रत जाळणार्‍या मनुवादी समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात यावा. (मनुस्मृतीची प्रत जाळणार्‍या समाजकंटकांवरही पोलिसांनी तात्काळ गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी केल्यास वावगे काय ? – संपादक) इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च सांगितले आहे की, केवळ १० वर्षे आरक्षण पद्धत ठेवा. नंतर ती रहित करावी; परंतु स्वार्थासाठी आरक्षणाच्या कुबड्या घेऊन चालणारे डॉ. आंबेडकर यांचा अवमान करण्यासही मागे-पुढे पहात नाहीत ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात