पकडण्यात आलेले कार्यकर्ते सनातनचे असल्याचे भासवून सनातनच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे ! – आमदार अजय चौधरी, शिवसेना

मुंबई – सनातन संस्थेवर जी बंदीची मागणी करण्यात येत आहे, त्याविषयी मी जाणतो. सनातनच्या कार्यकर्त्यांना मी जवळून पाहिले आहे. ते असे करूच शकत नाहीत. सध्याच्या प्रकरणात पकडण्यात आलेले कार्यकर्ते सनातनचे नाहीत, हे वारंवार तुम्ही सांगूनही ते तुमच्याच संघटनेचे आहेत, असे सनातनच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे, असे मत शिवसेनेचे आमदार श्री. अजय चौधरी यांनी व्यक्त केले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर करण्यात येत असलेले खोटे आरोप आणि सनातन संस्थेवरील बंदीची मागणी यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी आमदार श्री. अजय चौधरी यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले. सनातनसारख्या देशप्रेमी आणि राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीचा प्रयत्न केल्यास शिवसेना तुमच्या समवेत असेल, असेही या वेळी आमदार श्री. अजय चौधरी यांनी म्हटले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात