सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीचा अखिल भारतीय हिंदू महासभेकडून विरोध

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीला विरोध करणार्‍या हिंदू महासभेचे आभार !

नवी देहली – महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसांत काही जणांना अटक करण्यात आली आहे. त्याला काही प्रसारमाध्यमांनी आणि लोकांनी ‘हिंदु आतंकवाद’ असे म्हटले आहे. यापूर्वीच्या ९९ टक्के आतंकवादी कारवाया मुसलमानांद्वारे करण्यात आल्या, तेव्हा त्याला प्रसारमाध्यमांनी आणि तथाकथित विचारवंतांनी ‘इस्लामी आतंकवाद’ म्हटले नाही. आता हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर, उदाहरणार्थ सनातन संस्थेसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. त्याचा अखिल भारतीय हिंदू महासभा विरोध करते, असे हिंदू महासभेने म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात