म्हणे, ‘‘सनातन संस्थेसारखी जातीयवादी संस्था तरुणांचे डोके भडकवते !’’ – राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा बरळले !

हिंदु विधीज्ञ परिषदेने ‘विखे पाटील सहकारी साखर कारखान्या’तील घोटाळा उघड केल्याने फौजदारी होण्याच्या भीतीपोटी घोटाळेबाज राधाकृष्ण विखे पाटील सनातनवर वृथा आरोप करत आहे !

सांगली – डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे मारेकरी शोधायला सरकारला पाच वर्षे लागली. वास्तविक सनातन संस्थेसारखी जातीयवादी संस्था तरुणांचे डोके भडकवते. यात संभाजीनगर, कोल्हापूर येथील बहुजन तरुणांचा मारेकरी म्हणून त्यांनी वापर केला. याचे अन्वेषण पूर्वीच व्हायला हवे होते; पण सरकारने ते दाबून ठेवले, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते १ सप्टेंबर या दिवशी सांगलीत काँग्रेस कमिटीसमोर जनसंघर्ष यात्रेत बोलत होते. (अन्वेषण यंत्रणेने नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे या प्रकरणात सनातन संस्थेचा संबंध नसल्याचे वेळोवेळी सांगूनही केवळ सनातनद्वेषापोटी आणि धर्मांधांचे लांगूलचालन करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील सनातन संस्थेवर खोटे आरोप करत आहे. जनतेने लोकसभा, विधानसभा येथे धडा शिकवूनही शहाणे न झालेल्या काँग्रेस पक्षाला जनतेने आता येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत त्यांची जागा दाखवून काँग्रेस पक्षाला नामशेष केले पाहिजे ! – संपादक)

या वेळी राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले…

१.  अन्वेषण हळूहळू करा, असे आदेश पोलिसांना दिले. हे प्रकरण काढण्यासाठी कर्नाटक पोलिसांच्या विशेेष अन्वेषण पथकाला पुढाकार घ्यावा लागला, त्यांनी पुरावे गोळा करून महाराष्ट्र पोलिसांना दिल्यावर कारवाई चालू झाली. (तोंड आहे म्हणून बोलणारे राधाकृष्ण विखे पाटील ! – संपादक)

२. एकूणच सरकारला पुरोगामी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार संपवून हुकूमशाही आणायची आहे. यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांची चित्रे पुजणार्‍यांचे अन्वेषण होते. आम्ही काय त्यांचे नाही, तर भिडेगुरुजींचे छायाचित्र पुजायचे ? (श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी लक्षावधी देशभक्त सिद्ध केले. पू. भिडेगुरुजी यांच्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी पोहोचला. त्यामुळे अशा राष्ट्रभक्त, धर्मप्रेमी पू. भिडेगुरुजी यांचे महत्त्व राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्यांना काय कळणार ? अर्थात काँग्रेस पक्षातच घराणेशाही, भ्रष्टाचार, आंतकवाद्यांचे लांगूलचालन करणारा, धर्मांध असा असल्याने त्या पक्षाच्या नेत्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा ती काय करणार ?- संपादक)

३. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांमध्ये सनातन संस्था, भिडे गुरुजी यांच्या समर्थकांचा समावेश असल्याचे पुरावे हाती लागे. (राधाकृष्ण विखे पाटील सांगत असलेले असे कोणतेही पुरावे सरकारच्या हाती नाहीत. ‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे राधाकृष्ण विखे पाटील ! – संपादक) त्याविषयी पुरावे द्यायला आणि तसे पत्रकार बैठक घेऊन घोषित करायला पोलीस, मुख्यमंत्री कोणीच का पुढे सरसावले नाही. सनातन्यांना वाचविण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात