(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घाला ! – गिरीश चोडणकर

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नेते गिरीश चोडणकर यांचा सनातनद्वेष !

नक्षलवाद्यांशी संबंध असलेले लेखक आणि तथाकथित विचारवंत यांच्या अटकेविषयी ब्र ही न काढणारे गोव्यातील काँग्रेसचे नेते हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात मात्र अग्रेसर !

पणजी – लेखक आणि पुरो(अधो)गामी यांच्या हत्येला अनुसरून सनातन संस्थेच्या सदस्यांना कह्यात घेण्यात आल्याने संस्थेवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.  (एखाद्या संघटनेच्या सदस्यांना संशयावरून कह्यात घेण्यात आल्यावर त्या संघटनेवर बंदी घालण्याची तरतूद घटनेत आहे का ? तसे असेल तर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच नेत्यांच्या इशार्‍यावरून सहस्रो शिखांचे देहलीत हत्याकांड करून दहशत पसरवणार्‍या काँग्रेसवरही बंदी घालावी लागेल. – संपादक) ते पुढे म्हणाले, ही पूर्वी केलेली मागणी आज आम्ही पुन्हा करत आहोत. (पूर्वी महाराष्ट्र शासनाने पाठवलेला बंदीचा प्रस्ताव केंद्रातील काँग्रेस शासनानेच पुरेसे पुरावे नाहीत म्हणून परत पाठवला होता. ही काँग्रेसला चपराकच आहे. – संपादक) एखाद्या विचारधारेच्या लोकांना नष्ट करू पहाणार्‍यांना संस्था चालू ठेवण्याचा अधिकार नाही. (अशी बंदी राजकीय विरोधापोटी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची हत्या करणार्‍या साम्यवाद्यांवर का घातली नाही ? – संपादक)

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहे. गोवा हे एक निधर्मी राज्य असून हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. अशा प्रकारच्या संघटनांना गोव्यात प्रचार करण्यास मुभा दिल्यास गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो. (अध्यात्माचा प्रसार केल्यामुळे धार्मिक सलोखा कसा काय बिघडेल ? सनातनच्या कार्यामुळे गोव्यात धार्मिक सलोखा बिघडल्याचे एकतरी उदाहरण आहे का ? याउलट साधना करून गोव्यातील कित्येक जण संतपदाला पोहोचल्याची उदाहरणे मात्र आहेत. त्याकडे काँग्रेस डोळेझाक का करते ? – संपादक) यामुळे गोव्याचीच नव्हे, तर देशाची हानी होणार आहे. (सनातनच्या कार्यामुळे गोव्याचा आणि देशाचा उद्धारच होईल ! पुणे पोलिसांनी लेखक आणि पुरो(अधो)गामी यांना कह्यात घेऊन शहरी नक्षलवादाचा चेहरा नुकताच उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोव्यात साखळी येथील जीईएम् महाविद्यालयातील शिक्षक तथा लेखक तेलतुंबडे यांच्या निवासस्थानीही छापा टाकला होता; मात्र गोव्यातील या घटनेविषयी गिरीश चोडणकर गप्प का? शहरी नक्षलवाद काँग्रेसला मान्य आहे का? तेलतुंबडे यांच्यामुळे गोव्याचे नाव देशभरात अपकीर्त झाले नाही का ? – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात