(म्हणे) ‘सनातनसारख्या देशद्रोही संघटनांवर बंदी घाला !’ – एम्.आय.एम्.

कराड (जिल्हा सातारा) येथे हिंदुद्वेषी एम्.आय.एम्.चे हिरवे फुत्कार !

हिंदूनो, अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी एम्.आय.एम्. सारखे धर्मांध पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखे धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेले पक्ष एकत्र येतात. यावरून सनातन संस्था खर्‍या अर्थाने हिंदुहिताची भूमिका मांडते, हे लक्षात येते. सनातनसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी आणण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा द्या !

कराड (जिल्हा सातारा) – नालासोपारा, संभाजीनगर, तसेच देशातील विविध ठिकाणांहून सनातन, तसेच अन्य कट्टरवादी लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्व यांना धोका आहे. तरीही सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत, ही गोष्ट गंभीर असून या संघटनेवर बंदी घालून सखोल चौकशी करण्यात यावी, असे निवेदन एम्.आय.एम्. पक्षाच्या वतीने येथील तहसीलदारांना देण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. (चोराच्या उलट्या बोंबा ! देशाच्या अखंडतेला धोका राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेकडून नाही, तर फुटीरतावाद्यांची बाजू घेणार्‍या धर्मांधांकडून आहे, हे जनता ओळखून आहे. – संपादक)

निवेदनात म्हटले आहे की,

१. देशात ‘मॉबलिंचिंग’च्या घटनांमध्ये ७८ हून अधिक मुस्लिमांचे खून करण्यात आले आहेत. यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. (देशभरात लव्ह जिहादच्या नावाखाली हजारो युवतींचे धर्मांतर, अपहरण, बलात्कार तसेच खून केले गेल्याच्या शेकडो घटना प्रतिदिन उघड होत असतांना किती हिंदु धर्मांध आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करतात ? – संपादक)

२. मुस्लिम पर्सनल कायद्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. (पुरोगामीत्वाचा आव आणत हिंदूंच्या धर्मपरंपरा मोडीत काढण्यास निघालेल्या तथाकथित स्त्रीमुक्तीवादी संघटना आणि पुरोगामी याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे जाणा ! – संपादक)

३. वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत. (अतिक्रमणांविषयी जागरूक असलेले धर्मांध ! हिंदूंनो, तुमच्या मंदिरांचे सरकारीकरण झाले, देवस्थानची भूमी भ्रष्टाचार्‍यांनी लाटली, दान केलेल्या अर्पणावर डल्ला मारला, तुम्ही केव्हा जागे होणार ?  – संपादक)

४. आरक्षण हा मुस्लिम समाजाचा हक्क आहे. ते मिळालेच पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात