शिवसेना सनातन संस्थेच्या पाठिशी ठामपणे उभी आहे ! – अनिल शेटे, शिवसेना, तालुका उपप्रमुख

सांगली – हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर खोटे आरोप होणे हे वेदनादायी आहे. जे खरोखरच दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे; मात्र निर्दोषांच्या माथ्यावर आरोप थोपणे अयोग्य आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा प्रतिदिन नवनवीन नावे घेत आहे.

डॉ. दाभोलकर प्रकरणात आता जर नवीन आरोपी आहेत, तर दोन वर्षांपूर्वी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने जी नावे घेतली त्यांचे काय ? त्यामुळे अन्वेषण यंत्रणांच्या अन्वेषणावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. यापूर्वीही सनातन संस्थेवर खोटे आरोप, तसेच बंदीच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. शिवसेना सनातन संस्थेच्या पाठिशी ठामपणे उभी आहे, असे मत सांगली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे तालुकाउपप्रमुख श्री. अनिल शेटे यांनी व्यक्त केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात