सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात गावात ठराव करणार ! – परशुराम भोपी, माजी सरपंच, नितळस

निवेदन स्वीकारतांना उजवीकडे श्री. परशुराम भोपी, श्री. बळवंत पाठक आणि श्री. विजय सरगर

पनवेल, ३ सप्टेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेवर होणार्‍या संभाव्य अन्यायकारक बंदीच्या मागणीच्या संदर्भातील निवेदन भारतीय कामगार सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष, तसेच नितळस गावचे माजी सरपंच श्री. परशुराम भोपी यांना देण्यात आले. या वेळी श्री. भोपी म्हणाले, ‘‘बंदीची मागणी करणे हे अनाकलनीय आहे. आम्ही गावात बंदीच्या मागणीच्या विराधात ठराव सहमत करून शासनाकडे पाठवू, तसेच अन्य गावांत ठराव सहमत करण्यासाठी जागृती करू !’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात