(म्हणे) ‘मोदी सरकारने सनातनसारख्या संस्थांना अभय देऊन समाजाची हानी केली !’ – मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस

गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने जिहादी आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी आणि
भ्रष्टाचारी यांना अभय देऊन समाजाचा कोणता उद्धार केला आहे, हे खर्गे यांनी सांगावे !

कोल्हापूर – मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. धर्माधर्मांत दुफळी माजली आहे. ज्येष्ठ विचारवंत मारले जातात आणि मारेकरी सापडत नाहीत. मोदी सरकारने सनातनसारख्या संस्थांना अभय देऊन समाजाची हानी केली आहे. विचारवंतांना संपवण्याचे कारस्थान करणार्‍या या सरकारचा भांडवलशाही कारभार सहन केला जाणार नाही, असे विधान काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. (तथाकथित विचारवंतांचा पुळका असणारे मल्लिकार्जुन खर्गे यांना संपूर्ण भारतात संघ स्वयंसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या दिवसाढवळ्या हत्या होत असतांना सामाजिक वातावरण दूषित झाल्याचे जाणवले नाही का ? भ्रष्ट आणि हिंदुद्वेषी कारभार करणार्‍या काँग्रेसवाल्यांना जनतेने मागील निवडणुकीत त्यांची जागा दाखवली. असा कारभार करणार्‍या काँग्रेसवाल्यांना मोदी सरकारवर टीका करण्याचा अधिकार काय ? – संपादक) काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या प्रथम टप्प्याच्या शुभारंभी ते कोल्हापूर येथे बोलत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात