सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात नाशिक येथे लोकप्रतिनिधींना निवेदन सादर !

सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन देतांना

नाशिक – सनातन संस्थेवर करण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात येथील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. सनातन संस्थेवर होणारा हा अन्याय थांबवण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. नाशिकचे शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे, सिन्नरचे शिवसेनेचे आमदार श्री. राजाभाऊ वाजे आणि भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब सानप यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘आम्हाला सर्व माहिती आहे, काळजी करू नका’, अशी प्रतिक्रिया आमदार श्री. बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केली.

नाशिकचे शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे यांना निवेदन देतांना
भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांना निवेदन देतांना
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात