सनातन संस्थेवर बंदी येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतो ! – आमदार राजेश क्षीरसागर

(उजवीकडे) आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २ सप्टेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही. सनातन संस्थेवर बंदी येऊ नये, यासाठी मी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवतो, असे प्रतिपादन येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी येथे केले. १ सप्टेंबरला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने श्री. राजेश क्षीरसागर यांना सनातनवरील संभाव्य बंदीच्या मागणीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. मधुकर नाझरे, श्री. आदित्य शास्त्री, सनातनच्या सौ. अंजली कोटगी उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात