सनातनवर बंदी घालण्याच्या विरोधात मी सरकारला लेखी कळवीन ! – खासदार गजानन किर्तीकर, शिवसेना

डावीकडून श्री. अभय वर्तक, निवेदन स्वीकारतांना खासदार किर्तीकर, समवेत श्री. नरेंद्र सुर्वे

मुंबई – मी सनातनच्या संभाव्य बंदीच्या विरोधात सरकारला लेखी कळवीन, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर यांनी दिले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे आणि अन्य कार्यकर्ते यांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.

महाराष्ट्रात तथाकथित पुरोगामी आणि काँग्रेस पक्षाशी निगडित अनेक मंडळींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घाला, अशी मागणी केली आहे. सनातनच्या बंदीच्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध करावा आणि सनातनच्या पाठीशी उभे रहावे यासाठी मुंबईतील शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेला पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात गोवण्याचे षड्यंत्र चालू आहे, याविषयी त्यांना अवगत करण्यात आले. ते त्यांनी सविस्तररीत्या समजून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात