सनातन संस्थेच्या अपकीर्तीच्या विरोधात विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पत्रकार परिषद

डावीकडून विश्‍व हिंदू युवा सेनेचे श्री. संतोष विश्‍वकर्मा, धर्मसेना सेवा समितीचे अध्यक्ष श्री. शिवानंद कंबार, श्रीराम सेनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री. नीलकंठ कंदगल्ल, नगरसभेचे माजी सदस्य श्री. रवींद्र कुलकर्णी आणि श्रीराम सेनेचे श्री. बसवराज कल्याणप्पगोळ

विजयपूर (कर्नाटक) – सनातन संस्थेच्या होत असलेल्या अपप्रचाराचे खंडन करण्यासाठी ३१ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११.३० वाजता येथे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत श्रीराम सेना, धर्मसेना सेवा समिती, विश्‍व हिंदू युवसेना संघटना, तसेच माजी नगरसभा सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी १६ पत्रकार उपस्थित होते.

श्रीराम सेनेचे श्री. नीलकंठ कंदगल्ल म्हणाले, ‘‘सनातन संस्था गेल्या २५ वर्षांपासून समाजात धर्मप्रसार करत आहे, तसेच समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करत आहे. काही पुरोगामी विचारवंतांच्या हत्येनंतर काही निष्पाप हिंदु युवकांना अटक करून त्यांचा अमानुष छळ करून विशेष अन्वेषण पथक त्यांच्याकडून स्वतःला हवा तसा कबुलीजबाब घेत आहे. अटक केलेल्या युवकांचे सनातन संस्थेशी संबंध जोडून संस्थेचा अपप्रचार करत आहे. समाजात हिंदुत्वाचा प्रसार करणार्‍या संस्थेवर पुरावा नसतांना असा आरोप करणे निषेधार्ह आहे. हे आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना मिळून आंदोलन करणार आहोत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात