‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप, पत्रकार निखिल वागळे, तसेच सकाळ मीडिया ग्रुपच्या अलका धूपकर यांना सनातन संस्थेकडून कायदेशीर कारवाईची नोटीस

धादांत खोटी वृत्ते प्रसारित करून सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

फोंडा (गोवा) – ‘अक्षरनामा’च्या पोर्टलवर १६ ऑगस्ट २०१८ या दिवशी सकाळ मीडिया ग्रुप, तसेच सिंपल टाइम्सच्या संपादक अलका धूपकर यांनी ‘सनातन संस्था ही ‘सेक्युलर’ भारताच्या सुरक्षेला धोका आहे’, या मथळ्याखाली, तर पत्रकार निखील वागळे यांनी याच पोर्टलवर ‘सनातनच्या मुसक्या कोण बांधणार ?’ या मथळ्याखाली सनातन संस्थेच्या विरोधात धादांत खोटे लेख प्रसारित केल्याच्या प्रकरणी अलका धूपकर, पत्रकार निखिल वागळे यांच्यासह ‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप आणि पुणे येथील डायमंड पब्लिकेशन्स यांना सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत २७ ऑगस्ट २०१८ या दिवशी दोन स्वतंत्र कायदेशीर नोटिसा पाठवून प्रत्येकी १० कोटी रुपये मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी केली आहे, तसेच या मागणीची पूर्तता नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून १५ दिवसांच्या आत न झाल्यास पुढील कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागेल, असे या नोटिसीतून बजावले आहे. या कायदेशीर नोटिसीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही आपलेच असल्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात