पुढील काळात महाराष्ट्र आणि गोवा येथे सरकार स्थापन करण्यात परात्पर गुरु डॉ. आठवले अन् सनातन संस्था यांचे योगदान राहील !

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवरील ‘राजमंत्र’
कार्यक्रमातील पंडित राजकुमार शर्मा यांची भविष्यवाणी

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे पुष्कळ सात्त्विक असल्याने
ते पुरोगाम्यांच्या हत्येचे षड्यंत्र रचू शकणार नसल्याचेही स्पष्ट प्रतिपादन !

  • एका प्रख्यात ज्योतिषांनी जाहीर कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असे उद्गार काढणे ही त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावतीच आहे !
  • ज्यांना ज्योतिषशास्त्र पटत नाही, त्यांचा या भविष्यावर विश्‍वास नसला, तरी येणारा काळच सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्दोषत्व सिद्ध करणार आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी टीका करणे थांबवावे !
  • प्रतिकूल परिस्थितीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भविष्यकथन करून  समाजासमोर सत्य ठामपणे मांडणारे पंडित राजकुमार शर्मा यांचे आभार !
  • परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अनेक संत यांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्राचा प्रारंभ प्रथम राज्याराज्यांमध्ये होईल. नंतर संपूर्ण भारतभरात आणि नंतर विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापन होईल. पंडित शर्मा यांची ही भविष्यवाणी म्हणजे संतांनी केलेल्या भाकितांची सत्यता दर्शवते !

कोल्हापूर, २ सप्टेंबर (वार्ता.) – १ सप्टेंबरला सायंकाळी ‘जय महाराष्ट्र’ या मराठी वृत्तवाहिनीवरील ‘राजमंत्र’ या कार्यक्रमात प्रख्यात ज्योतिषी पंडित राजकुमार शर्मा यांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी भविष्य विचारण्यात आले. त्या वेळी पंडित शर्मा म्हणाले, ‘‘डॉ. जयंत आठवले यांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यानंतर ते पुष्कळ सात्त्विक असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांच्याकडून डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगाम्यांच्या हत्यांचे षड्यंत्र रचले जाणे अशक्य आहे. त्यांनी लक्षावधी लोकांना घडवले आहे. पुढील काळात सरकार स्थापन करण्यासाठी गोवा आणि महाराष्ट्र राज्यांतील लोकप्रतिनिधी डॉ. आठवले यांच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील, अशी भविष्यवाणी वर्तवली. वास्तविक या कार्यक्रमात निवेदक हर्षवर्धन यांनी ‘नालासोपारा प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याने डॉ. जयंत आठवले यांचे काय होणार ? पुरोगाम्यांच्या मागणीनुसार त्यांना अटक कधी होणार ? त्यानुसार जयंत आठवले यांची भविष्यवाणी काय म्हणते ?’, असा नकारात्मक प्रश्‍न विचारला होता. प्रत्यक्षात पंडित शर्मा यांनी या प्रश्‍नाच्या अगदी उलट सकारात्मक उत्तर दिल्याने निवेदन हर्षवर्धन तोंडघशी पडल्याचे दिसून आले. पंडित शर्मा यांनी प.पू. डॉ. आठवले यांच्याविषयी अचूक भविष्यवाणी केल्याने निवेदक हर्षवर्धन यांनी त्यांना सनातनविषयी पुढील नकारात्मक प्रश्‍न विचारले नाहीत.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पंडित राजकुमार शर्मा यांनी सांगितलेली भविष्यवाणी

१. डॉ. जयंत आठवले यांच्या कुंडलीचे अध्ययन केल्यानंतर अशी माहिती मिळते की, नागोठणे (जिल्हा रायगड) येथे त्यांचा जन्म झाला आहे. (प्रत्यक्षातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म नागोठणे येथेच झालेला आहे ! – संपादक) त्यांचा मीसुद्धा हितचिंतक आहे. (फॉलो करतो.) एक सज्जन आणि डॉक्टर प्रवृत्तीची ही व्यक्ती धर्मरक्षण आणि धर्मसद्भावना यांच्या गोष्टी सांगते. डॉ. आठवले यांचे उग्रवादाशी (कट्टरतावाद) काही देणेघेणे नाही. तुम्ही पडद्यावर (स्क्रीनवर) त्यांचा चेहरा पहा. एक सज्जन व्यक्ती, ज्यांना जगद्गुरु शंकराचार्य यांचे आशीर्वाद मिळाले आहेत, त्यांच्यावर विविध स्तरावरचे आरोप केले गेले, ते चुकीचे आहेत.

२. त्यांच्याविषयी मी अधिक माहिती देतांना सांगतो की, डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९९ मध्ये संमोहन (हिप्नोटीझम) व्यवसाय बंद केला होता. लक्षावधी रुग्णांना त्यांनी निःशुल्क बरे केले. संमोहन या विषयावर त्यांनी मोठ्या स्तरावर कार्यशाळा (वर्कशॉप) घेतल्या आहेत. त्यामधून त्यांनी ‘जीवन कसे जगावे’, ‘जीवनशैली कशी असते’, हे शिकवले. (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना गुरुप्राप्ती झाल्यानंतर वर्ष १९९३ मध्ये संमोहन उपचारतज्ञ म्हणून कार्य करणे बंद केले ! – संपादक)

३. वर्ष १९९९ मध्ये धर्मरक्षण आणि हिंदु धर्मरक्षण, यांसाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेतील काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला असेल, तर ते लोक दंडाधिकारी आहेत.

४. डॉ. जयंत आठवले यांच्यासारख्या व्यक्तींना मी माझ्या परिभाषेत संत मानतो. प्रेक्षकांनी त्यांचा चेहरा काळजीपूर्वक आणि निरखून पहावा. (या वेळी पडद्यावर प.पू. डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवण्यात येत होते.) त्यांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यानंतर ‘त्यांंनी कॉ. पानसरे, कलबुर्गी, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे षड्यंत्र रचलेले आहे’, असे वाटत नाही. डॉ. जयंत आठवले यांची मकर रास आहे. मकर रास ही स्थिर रास आहे. (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आजवर अनेक संतांनी गौरवलेले आहे. तसेच नाडीज्योतिषाद्वारे महर्षींनीही त्यांच्या कार्याची महती वर्णन केली आहे. अशा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केवळ त्यांचे छायाचित्र पाहून संत म्हणून ओळखणे, यावरून पंडित शर्मा यांचेही श्रेष्ठत्व लक्षात येते ! – संपादक)

५. प्रेक्षकांनो, एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका की, जेवढे हिंदुरक्षक आहेत, त्यांनी डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या सनातन संस्थेला पाठिंबा दिला आहे. डॉ. जयंत आठवले यांचा अगदी दूरदूरपर्यंत पुरोगाम्यांच्या हत्येशी कोणताही संबंध आहे, असे मला कुठेही जाणवत नाही.

शंकराचार्य, महर्षि आणि संत यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले
यांच्याविषयी वेळोवेळी वर्तवलेले भविष्य आणि काढलेले गौरवोद्गार !

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सत्त्वशील, त्यागी आणि महान पुरुष आहेत. त्यांचे कार्य आदिशंकराचार्यांच्या कार्यासारखे आहे!’ – पूर्वाम्नाय श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंदसरस्वती, श्रीगोवर्द्धनमठ-पुरीपीठाधीश्‍वर, ओडिशा

२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले करत असलेले कार्य हे जनहिताचे आणि राष्ट्रहिताचे आहे. त्यायोगे हिंदु धर्माला आलेली मरगळ निश्‍चितपणे नाहीशी होईल आणि‘सनातन धर्माचे आचरण करावे’, असे जनतेला वाटून त्याप्रमाणे निश्‍चितपणे ती आपले आचरण सुधारेल.’ – जगद्गुरु शंकराचार्य विद्याशंकरभारती, करवीर पीठ

३. ‘गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आदि शंकराचार्यांचे परिपूर्ण आशीर्वाद लाभले आहेत. राष्ट्राचे सिंहासन आध्यात्मिक सिंहासन बनणार आहे. गुरूंना सांगा, ‘ते सिंहासन त्यांची वाट पहात आहे. त्यांना कुणीही थांबवू शकत नाही.’ – महर्षि (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून)

४. ‘आजच्या विज्ञानयुगातही परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत.’ – प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य प.पू. दादा महाराज, भाळवणी (विटा)

आतापर्यंत पंडित शर्मा यांनी राजकीय घडामोंडीविषयी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली !

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘राजमंत्र’ हा कार्यक्रम करण्यात येतो. या कार्यक्रमात पंडित राजकुमार शर्मा यांना विविध राजकीय क्षेत्रातील व्यक्तींविषयी भविष्यवाणी विचारण्यात येते. त्या वेळी शर्मा यांनी राजकीय घडामोंडीचा वेध घेत वर्तवलेली राजकीय भविष्यवाणी ही ९९ टक्के खरी ठरलेली आहे. त्यांनी अरुण जेटली पदावरून पायउतार होणार, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आजारपणामुळे मुख्यमंत्र्यांची धुरा अन्य व्यक्तीकडे जाणार आहे, अशी काही भविष्येही वर्तवली आहेत.

पंडित राजकुमार शर्मा यांचा थोडक्यात परिचय

पंडित राजकुमार शर्मा हे विश्‍वविख्यात ज्योतिषी आहेत. ‘अचूक भविष्यवेध घेणारे पंडित म्हणून राजकुमार शर्मा यांची ख्याती आहे. ते प्रामुख्याने अर्थ, क्रीडा, विवाह, व्यवसाय आदी विषयांवर भविष्य सांगण्यात पारंगत आहेत. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ‘बीबीसी’ या जागतिक वृत्तवाहिनीने जगातील काही निवडक ज्योतिषांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पंडित शर्मा हे त्यांपैकी एक आहेत. भारतातील विविध वृत्तवाहिन्यांवर त्यांचे ज्योतिषशास्त्राविषयी अनेक कार्यक्रम प्रसारित होत असतात.

पंडित राजकुमार शर्मा यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती नम्रभाव !

कार्यक्रमात पंडित शर्मा यांनी भविष्यवाणी सांगतांना दोन्ही हात जोडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार केला !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची भविष्यवाणी सांगतांना पंडित राजकुमार शर्मा म्हणाले, ‘‘पुढील काही दिवसांमध्ये गोवा आणि महाराष्ट्र राज्यांत अशी वेळ येईल की, डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांचा सरकार बनवण्यातही मोठा हात (योगदान) राहील.’’ त्यांनी ‘प्रेक्षकांच्या माध्यमातून मी डॉ. जयंत आठवले यांना प्रणाम करत आहे’, असे सांगून नम्रपणे दोन्ही हात जोडून नमस्कार केला.

वैशिष्ट्यपूर्ण

‘जय महाराष्ट्र’वरील ‘राजमंत्र’ या कार्यक्रमात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ‘पंडित शर्मा प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करणार आहात ?’, असे निवेदक हर्षवर्धन यांनी विचारले. त्या वेळी सर्वप्रथम पंडित शर्मा यांनी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ असा नामजप करून त्यांनी श्रीकृष्णाला वंदन केले. पुढे ते म्हणाले, ‘‘देशात जो हाहा:कार माजलेला आहे. पावसामुळे मोठा प्रलय आलेला आहे. राजकीय सुनामी आलेली आहे, त्यासाठी भगवान श्रीकृष्णाला हीच प्रार्थना आहे की, आपल्या देशात शांती स्थापित राहून देशातील वातावरण चांगले राहू दे. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाची आराधना करणे आवश्यक आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात