‘पुरोगामी म्हणवणारे ‘डॉ. दाभोलकर हत्येचा खटला’ का चालवू देत नाहीत ?’ – राहुल कौल, युथ फॉर पनून कश्मीर, पुणे

सनातन संस्थेवर बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा अभिप्राय

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे षड्यंत्र ५ वर्षांनंतर पुन्हा नव्याने चालू झाले आहे. या ५ वर्षांत खरे मारेकरी का सापडले नाहीत, याचे उत्तर द्या. मारेकरी सापडले न गेल्यानेच प्रत्येक वेळी धर्म आणि राष्ट्र यांना सर्वश्रेष्ठ मानणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बंदीची मागणी केली जात आहे. ज्यांना लक्ष्य करणे सहज शक्य आहे, अशांकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी का प्रयत्न केले जात आहेत ? दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी असणार्‍यांनी खटला चालवण्याची मागणी करूनही स्वतःला पुरोगामी म्हणवणारे तो का चालवू देत नाहीत, याचे उत्तर दिले पाहिजे.

आपल्याच देशातील विस्थापित काश्मिरी हिंदूंविषयी संपूर्ण देशभरात आवाज उठवणार्‍या आणि काश्मीरच्या मूळ रहिवाशांना त्यांचा अधिकार देण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणणे योग्य नाही. खर्‍या मारेकर्‍यांना पकडण्यात यश येत नसल्यानेच सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आज देशाचे तुकडे तुकडे होत आहेत; पण ही निष्क्रियता लपवून देशाच्या विनाशाकडे केवळ पाहिले जात आहे. हे कधीपर्यंत चालू देणार, याचे उत्तर द्या !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात