टीपू सुलतान संघर्ष समितीच्या विरोधामुळे पोलिसांकडून बेळगाव येथील सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात मोर्चा रहित

धर्मांधांच्या दबावाला बळी पडणारे पोलीस हिंदूंना मात्र कायद्याचा धाक दाखवतात !

बेळगाव – सनातनवरील संभाव्य बंदीच्या षड्यंत्राच्या विरोधात, तसेच हिंदुत्वनिष्ठांवरील केलेल्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात १ सप्टेंबर या दिवशी शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. टीपू सुलतान संघर्ष समितीने निवेदन दिल्याने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने अचानक ३१ ऑगस्ट या दिवशी मोर्चा रहित करण्यास सांगितल्यावर समितीने तो रहित केला. हिंदु जनजागृती समिती प्रत्येक कृती वैध मार्गानेच करत असल्याने पोलीस प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत १ सप्टेंबरचा मोर्चा हिंदु जनजागृती समितीने रहित केला आणि जिल्हाधिकार्‍यांना केवळ निवेदन दिले.

(हिंदूंवर होणार्‍या या अन्यायामुळेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची कुणी मागणी केली, तर ते चुकीचे कसे ? देशद्रोह्याच्या नावाने चालवल्या जाणार्‍या संघटनेच्या चेतावणीवरून हिंदुबहुल भारतातील एका जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठांच्या मोर्च्याला अनुमती नाकारणे निषेधार्ह आहे. हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावे टाहो फोडणार्‍यांना चुकीची वाटणार नाही. कारण देशात अल्पसंख्यांक लाभार्थी आहेत, तर हिंदू अस्तित्वहीन !- संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या आजपर्यंतच्या कोणत्याही आंदोलनामुळे कधीच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला नसतांना केवळ एका संघटनेच्या निवेदनामुळे पोलीस प्रशासनाने मोर्चा रहित करण्यास भाग पाडल्याने या प्रशासनाच्या दडपशाहीचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

देशद्रोही टीपू सुलतानच्या नावे चालवल्या  जाणार्‍या या संघटनेची चौकशी करा !

वास्तविक २३ ऑगस्ट या दिवशी मोर्च्याचे रितसर अनुमती आवेदन देण्यात आले होते, तसेच याची सर्व सिद्धताही पूर्ण झाली होती. असे असतांना अचानक ३१ ऑगस्ट या दिवशी पोलीस प्रशासनाने आयोजकांना बोलावून, ‘टीपू सुलतान संघर्ष समितीच्या मुसलमान कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना ‘सनातनच्या मोर्च्याला अनुमती देऊ नये आणि मोर्चा झाला तर आम्हालाही मोर्चा काढण्यासाठी अनुमती द्यावी लागेल’, असे निवेदन दिले आहे.

५ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रपती कोविंद यांचा दौरा आहे, तसेच आगामी गणेशोत्सव यांचा विचार करता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही ही अनुमती नाकारत आहे. तुम्ही विनाअनुमती मोर्चा काढला, तर गुन्हा प्रविष्ट करू, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीने १ सप्टेंबर या दिवशी मोर्चा रहित करून केवळ निवेदन दिले. देशद्रोही टीपू सुलतानच्या नावे चालवल्या जाणार्‍या या संघटनेची चौकशी करावी आणि ‘अचानक अन्य संघटनेने मोर्चा’ काढण्याच्या मागणीच्या मागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी या वेळी श्री. हृषिकेश गुर्जर यांनी केली.

पूर्वग्रहदूषितपणे सनातन संस्थेवर खोटे आरोप साम्यवादी करत
असून ते अन्वेषणाची दिशा भरकटवत आहेत ! – हिंदु जनजागृती समिती

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी ‘गौरी लंकेश हत्येत सनातन संस्थेचा हात असल्याचे सिद्ध झालेले नाही’, असे सांगूनही ‘सनातन संस्था आतंकवादी संस्था आहे, सनातन संस्थेवर बंदी घालावी’, अशी मागणी करणार्‍या साम्यवाद्यांना सनातनविषयी असलेला द्वेष उठून दिसतो. सर्व अन्वेषण संस्थांनी या हत्येमागे कोणतीही संघटना नाही, असे सांगूनही सनातन संस्थेवर आरोप करणे म्हणजे अन्वेषण यंत्रणेवर दबाव आणून अन्वेषणाची दिशा पालटण्याचे षड्यंत्र आहे. काँग्रेस नेत्यांचे साखर कारखाने, शिक्षण संस्था, देवस्थानांच्या कार्यकारणींचा भ्रष्टाचार सनातनने उघड केला आहे. त्यामुळे द्वेषाचे राजकारण काँग्रेसचे भ्रष्ट नेते करत आहेत. हेच सनातनची अपकीर्ती करत आहेत. आज देशात माननीय नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून ५ शहरी माओवादी नक्षलींना अटक करण्यात आली आहे. त्याविषयी कोणीच बोलत नाही. केवळ सनातन संस्थेविरुद्ध अपप्रचार करण्याचे षड्यंत्र आहे.

जिल्हाधिकार्‍यांचे नाव असलेले निवेदन अपर जिल्हाधिकारी ए.बी. बुध्याप्पा यांनी स्वीकारले. या वेळी भाजपचे बेळगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस श्री. धनंजय जाधव, भाजपचे उत्तर विभाग उपाध्यक्ष श्री. मारुती सुतार, विश्‍व हिंदु परिषद शहर कार्यदर्शी श्री. हेमंत हवळ, स्वा. सावरकर प्रतिष्ठानचे श्री. संजय रायकर, अधिवक्ता राम घोरपडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. पंकज घाडी, धर्मप्रेमी श्री. विजय मेलगे, धर्मप्रेमी श्री. अनिल कुरणकर, अन्नपूर्णा मंदिराचे विश्‍वस्त श्री. वीरेंद्र हेगडे, पौरोहित्य संघटनेचे श्री. श्रीपाद देशपांडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर, श्री. हृषिकेश गुर्जर यांसह ४० धर्मप्रेमी या वेळी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात