नवी मुंबई येथील वाचकांनी साधकांकडे नालासोपारा घटनेनंतर दिलेल्या प्रतिक्रिया

प्रसिद्धीमाध्यमांनी संतांची कितीही अपकीर्ती केली, तरी
वाचकांचा सनातनवर असलेला विश्‍वास तसूभरही ढळलेला नाही !

असे निष्ठावंत वाचक हीच सनातनची शक्ती !

धाडीत सापडलेले साहित्य इतके लपवून का ठेवत
आहेत ? सत्य आहे, तर घ्या पत्रकार परिषद आणि दाखवा सर्वांना !

सनातन प्रभातच्या हिंदी पाक्षिकाचे एक जुने वाचक शीख पंथीय असून त्यांचा बॅटरीजचा व्यवसाय आहे. त्यांनी नालासोपारा प्रकरणाविषयी काय चालले आहे ?, अशी साधकांकडे विचारणा केली. ते म्हणाले, असे कोणी आपल्या घरी बॉम्ब बनवून ठेवेल का ? करणारा दुसरे ठिकाण शोधेल. धाडीत सापडलेले साहित्य इतके लपवून का ठेवत आहेत ? सत्य आहे, तर घ्या पत्रकार परिषद आणि दाखवा सर्वांना.

हिंदु राष्ट्राविषयी ठामपणे बोलता, त्याला उत्तर नसल्याने तुमच्यावर अशी कारवाई होत असावी !

मसाला बाजारपेठेत व्यवसाय असलेल्या सनातन प्रभातच्या साप्ताहिकाच्या वाचकाने सनातन संस्था आध्यात्मिक संस्था आहे आणि तुमचे सर्व कार्य सनदशीर मार्गाने चालते; परंतु तुम्ही हिंदु राष्ट्राविषयी जे ठामपणे बोलता,त्याला उत्तर नसल्याने तुमच्यावर अशी कारवाई होत असावी, अशी प्रतिक्रिया दिली .

हे सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात रचलेले षड्यंत्र !

बंदीचे हे सर्व जुने झाले आहे. लोकांना आता सवय झाली आहे. हे सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे, अशी प्रतिक्रिया दैनिक सनातन प्रभातच्या एका वाचकाने दिली.

एका वाचकांनी तुम्ही भाजप सरकारवर कठोर शब्दांत टीका करता. भाजपमधील अनेकांचे बीफ माफिया आणि गुजरात कनेक्शन आहे. त्यामुळे गोरक्षक राऊत यांना अटक झाली आणि आता सनातनची अपकीर्ती करण्याची मोहीम चालू झाली आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रिया

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या बाजूने उभे रहाणार्‍या सनातनला समर्थन द्यायलाच हवे ! – श्री. वडतकर, योग वेदांत सेवा समिती

जेव्हा सर्वजण पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंच्या विरोधात होते, तेव्हा धोका पत्करून केवळ सनातननेच आमची बाजू घेतली. नंतर सर्वांच्या टीका सहनही केल्या. बापू कारागृहातील जेवण घेत नव्हते, तेव्हा अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी न्यायालयात दाद मागून त्यांना घरचे जेवण चालू करून दिले. त्यामुळे आता सनातनला समर्थन द्यायलाच हवे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात