(म्हणे) सनातनच्या मोर्च्यामुळे शहरात वाहतूककोंडी झाली !

एका मराठी वृत्तपत्राची वैचारिक दिवाळखोरी !

ठाणे येथे झालेला सनातनचा मोर्चा शिस्तबद्ध होता !, असे उपस्थित असलेल्या पोलिसांनी सांगितले. याविषयी सनातनद्वेष्ट्या वृत्तपत्राला काय म्हणायचे आहे ?

ठाणे – सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात ठाणे येथे २८ ऑगस्टला सनातन संस्था आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून मोर्चा काढला. यात १ सहस्राहून अधिक समर्थक सहभागी झाले होते. मोर्चा शांततेत शिस्तबद्धपणे आणि कोणतीही कायदाबाह्य कृती न होता वेळेत पार पडला; मात्र तरीही एका वृत्तपत्राच्या वृत्ताच्या प्रसिद्धीतून सनातनद्वेषाची कावीळच दिसून येते. २९ ऑगस्टला त्या वृत्तपत्रात विविध विषयांवर राज्यात निघालेल्या ४ मोर्च्यांचे वृत्त वेगवेगळ्या पानांवर प्रसिद्ध केले होते; मात्र सनातनच्या मोर्च्याचे वृत्त देतांना शहरात वाहतूककोंडीमुळे प्रतिदिन वाहनचालकांची अडवणूक होते. यात सनातनच्या मोर्च्यामुळे वाहतुकीस पुष्कळ अडथळा निर्माण झाला. सर्वांना त्रास झाला, असे प्रसिद्ध करण्यात आले. (सनातन संस्थेविषयीचा वृत्तपत्राचा द्वेष यातून दिसून येतो. – संपादक)

हा प्रकार भेदपूर्वक केला असल्याचे न समजण्याइतकी सर्वसामान्य जनताही नक्कीच दूधखुळी नाही, हे वृत्तपत्राने लक्षात घ्यावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात