म्हणे) ‘नक्षलवादाच्या नावाखाली चालू असलेली धरपकड ही सनातन्यांवरून लक्ष हटवण्यासाठी !’ – अशोक चव्हाण

पुणे – देशात नक्षलवादाच्या नावाखाली चालू असलेली धरपकड ही सनातन्यांवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ३० ऑगस्टला येथे केला. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात सरकार कठोर कारवाई का करत नाही ? (आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी असे वक्तव्य करणे शोभत नाही; कारण पोलिसांनी सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात पुरावे नसल्याने त्यांना दोषी ठरवलेले नाही. – संपादक) दुसरीकडे विचारवंतांची धरपकड चालू असून आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारच्या कारवाया चालू आहेत, असेही त्यांनी सांगितले. येथील महापालिकेच्या वतीने वसंतराव बागुल उद्यानातील ‘ग्रे वॉटर’ प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, संभाजी भिडे यांना कुठल्याही चौकशीविना मुख्यमंत्री ‘क्लीनचीट’ देतात हे कशाचे लक्षण आहे ? याउलट सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलणार्‍या विचारवंतांची धरपकड करून दबावतंत्रांचा वापर करण्यात येत आहे. (याविषयी पुरावे पुणे आणि मुंबई पोलिसांनी सादर केले आहेत. चव्हाण यांचा पोलिसांवर विश्‍वास नाही कि तेच या नक्षलप्रेमींची पाठराखण करत आहेत ? – संपादक) त्याच वेळी सनातन संस्था, भिडेगुरुजी, मिलिंद एकबोटे, नालासोपारा प्रकरणातील संशयित आरोपींवर प्रभावी कारवाई होत नाही. नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर यांची कार्यवाही (जीएसटी) यामध्ये आलेले अपयश दाबण्यासाठी, तसेच जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी सरकारकडून कारवाई चालू आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात