(म्हणे) ‘सनातनी कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी विचारवंतांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव निर्माण करावा !’ – राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा, विरोधी पक्षनेते

हिंदु विधीज्ञ परिषदेने ‘विखे पाटील सहकारी साखर कारखान्या’तील घोटाळा उघड केल्याने फौजदारी कारवाई होण्याच्या भीतीपोटी घोटाळेबाज राधाकृष्ण विखे पाटील सनातनवर बंदी आणण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत, हे सूज्ञ जनता ओळखून आहे !

हिंदु विधीज्ञ परिषदेने विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील उघड केलेला घोटाळा !

नगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने लाभार्थी शेतकर्‍यांची खोटी सूची सादर करून डिसेंबर २००९ मध्ये ८ कोटी ८६ लाख रुपयांची कर्जमाफी पदरात पाडून घेतली. लेखा परीक्षणात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर १८ ऑगस्ट २०११ या दिवशी संंबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन सहकारमंत्र्यांनी दिले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कारखान्यात कोट्यवधींचा अपहार केला आहे. या संदर्भात २१ मार्च २०१८ या दिवशी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन हिंदु विधीज्ञ परिषदेने हा घोटाळा उघड केला. या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीसह अरुण कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका प्रविष्ट केली आहे.

कोल्हापूर – कर्नाटक एस्आयटीच्या कारवाईनंतर भाजप सरकार डॉ. दाभोलकर हत्येच्या संदर्भात कारवाई करत आहेत. बहुजन समाजातील तरुणांच्या हाती शस्त्रे देऊन हिंसा घडवण्याचे पाप सनातन संस्था करत आहे. (कोण पाप करत आहे, ते जनता जाणून आहे ! देशात ७० वर्षांत काँग्रेसनेच आतंकवाद्यांना छुपे साहाय्य, गुन्हेगारी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सहस्रो शिखांच्या कत्तली, काश्मीरमधील हिंदूंचे विस्थापन आणि त्यांचा छळ, अनैतिकता अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. काँग्रेस पक्ष राज्य करण्याच्या लायकीचा नसल्यानेच त्याला जनतेने सत्तेतून खाली खेचले. आता या पक्षावर बंदी घालून त्याला देशातून कायमचे हद्दपार केले पाहिजे ! – संपादक) या विनाशक शक्तींमागे सरकारचेच पाठबळ आहे. महाराष्ट्रातील तरुणांची माथी भडकावून त्यांच्या हाती पिस्तुले, बॉम्ब देणार्‍या सनातनी कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी विचारवंतांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव निर्माण करावा, असे अकलेचे तारे काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील येथे तोडले. (अन्वेषण यंत्रणेने सनातन संस्थेचा संबंध नसल्याचे वेळोवेळी सांगूनही केवळ सनातनद्वेषापोटी आणि पुरो(अधो)गामी, धर्मांध यांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेसचे नेते खालच्या पातळीला जाऊन सनातन बंदीची भाषा करत आहेत. अशा नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक) ३१ ऑगस्टला कॉ. पानसरे कुटुंबातील उमा पानसरे आणि मेधा पानसरे यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सनातनवरील बंदीची मागणी आणि सरकारच्या इशार्‍यावर चालू असलेल्या पुरोगामी, डाव्या विचारवंतांच्या अटकसत्राविषयीही त्यांनी पानसरे कुटुंबातील उमा पानसरे आणि मेघा पानसरे यांच्याशी चर्चा केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,

१. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येचे मुळापासून अन्वेषण करण्याची सरकारची मानसिकता नाही.

२. कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश हत्येतील आरोपींना पकडल्यानंतर अब्रू जाण्याच्या भीतीने महाराष्ट्रातील पोलिसांकडून संशयितांची धरपकड चालू आहे. अटकेतील संशयितांचा सनातन संस्थेशी असलेला संबंध नवीन नाही.

३. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव काँग्रेस सरकारच्या काळात दिला होता; मात्र आज सरकार सनातन संस्थेला पाठीशी घालत आहे. (पुरावा नसल्यामुळे तत्कालीन काँग्रेसच्या केंद्र सरकारने ‘सनातन संस्थेवर बंदी घालता येत नाही’, हे स्पष्ट केले होते. असे असतांना विखे पाटील प्रसारमाध्यमांपासून सत्य का लपवत आहेत ? – संपादक)

४. देशात विचार संपवण्याची प्रक्रिया चालू आहे. पोलिसांनी राबवलेल्या नक्षलवाद्यांशी संबंधित असणार्‍या अटकसत्राची सर्वोच्च न्यायालयानेही नोंद घेतली. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे कारस्थान रचणारे नक्षलवादी समर्थक आणि विचारवंत यांना विखे पाटील यांचा पाठिंबा आहे, असेच यातून जनतेने समजायचे का ? – संपादक) 

५. देशात सध्या अघोषित आणीबाणीचे वातावरण आहे. संशयितांची धरपकड चालू होताच सरकारने एस्आयटीच्या प्रमुखांचे स्थानांतर केले. किरकोळ कारणांवरून अभिनंदन करत फिरणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आतंकवादविरोधी पथकाचे साधे अभिनंदनही केले नाही. (हे सांगण्याचा विखे पाटील यांना अधिकार आहे का ? पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले, तर यात अभिनंदन कसले ? – संपादक)

६. आतंकवादविरोधी पथकाची कामगिरी महत्त्वाची असूनही ती मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्षित केली जात आहे. यातूनच त्यांची मानसिकता कळते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात