(म्हणे) सनातन संस्थेच्या कटापासून लक्ष विचलित करण्यासाठी विचारवंतांचे अटकसत्र !

पुण्यात नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ शहरी कॉम्रेड यांचा रस्त्यावर येऊन थयथयाट !

पुणे – शहरी नक्षलवाद रुजवणार्‍या नक्षलवाद्यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यावर नक्षलवादाचे समर्थक, तसेच कथित मानवाधिकार कार्यकर्ते यांनी थयथयाट चालू केला आहे. याचाच एक भाग म्हणून ३० ऑगस्टला आम्ही शहरी कॉम्रेडचे नारे देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी अत्यंत विखारी भाषणे करत नक्षलवाद्यांना अटक करणार्‍या पुणे पोलिसांचा, तसेच सत्ताधारी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन यांचा निषेध करण्यात आला. दाभोलकर, पानसरे, लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्यांच्या अन्वेषणात सनातन संस्थेचे नाव पुढे आले. ईद आणि गणपति उत्सवात बॉम्बस्फोट घडवून धार्मिक दंगली घडवण्याचा त्यांचा कट होता. त्यापासून लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी ही अटकसत्रे करण्यात आली, असा आरोप या वेळी करण्यात आला. (शहरी नक्षलवाद्यांची थिअरी ! असल्या फालतू दाव्यावर शेंबडे पोरही विश्‍वास ठेवू शकत नाही ! – संपादक)

हिंदुत्व आणि भारतीयत्व यांवर गरळओक करणार्‍या एल्गार परिषदेचेही या वेळी समर्थन करण्यात आले, तसेच पू. भिडेगुरुजींच्या अटकेची मागणी करण्यात आली. या प्रसंगी कथित समाजसेविका किरण मोघे, विद्या बाळ, सुभाष वारे यांसह अन्य उपस्थित होते.

सनातन संस्थेकडे शस्त्रास्त्रे, तसेच बॉम्ब बनवण्याची साधने सापडली, तरी संस्थेवर बंदी येत नाही आणि संस्थेच्या वरिष्ठांना अटक होत नाही; मात्र फुले, शाहू, आंबेडकर यांचे साहित्य सापडल्याचा नावाखाली देशद्रोही म्हणून अटक होते, हा सरकारचा पक्षपातीपणा आहे, असा कांगावा या वेळी करण्यात आला. (कुठल्याही अन्वेषण यंत्रणांनी सनातन संस्थेला कुठल्याही प्रकारणात दोषी ठरवले नाही. असे असतांना सातत्याने खोटा प्रचार करणे म्हणजे सूर्याला काळे म्हणण्यासारखे आहे. सूर्य काळे असल्याची घोषणाबाजी केल्याने सूर्य तर काळा ठरतच नाही, उलट नारेबाजी करणार्‍यांचीच बौद्धिक दिवाळखोरी उघड होते. – संपादक)

अटक करण्यात आलेले नक्षलवादी हे मान्यवर अधिवक्ते, लेखक, विचारवंत आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते देशातील, मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, वंचित जनतेच्या हक्कांसाठी लढणारी आणि सरकारी धोरणांच्या विरोधात आवाज उठवणारे आहेत. त्यांचा आवाज आणि विचार दडपण्यासाठी त्यांच्या अटकेची खेळी करण्यात आली. (नक्षलसमर्थकांना अटक झाल्यानंतर ज्या तडफेने कथित पुरोगामी आणि संविधानवाले बिळातून बाहेर आले, ते पहाता या सर्वांचीही पोलीस चौकशी व्हायला हवी. – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात