‘सनातन संस्थेला आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !’ – हिंदु हितरक्षण वेदिकेचे तीर्थहळ्ळी तहसीलदारांकडे निवेदन

तहसीलदारांना (उजवीकडे) निवेदन देतांना कार्यकर्ते

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) – गौरी लंकेश यांची हत्या होऊन एक वर्ष पूर्ण होत आले आहे. या प्रकरणात हिंदु संघटनांच्या निष्पाप युवकांना पुराव्याविना चौकशीच्या नावाखाली लक्ष्य केले जात आहे. साम्यवादी विचारसरणीचे याच संधीचा लाभ उठवत सनातन संस्थेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करा, असे सांगत सरकारवर दबाव आणत आहेत. असे मिथ्या आरोप करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु हितरक्षण वेदिकेकडून येथील तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी या संघटनेचे पदाधिकारी आणि २५ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात