‘सनातनच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे ! ‘– स्वामी चक्रपाणी, अध्यक्ष, हिंदु महासभा

सनातनवर सध्या लावण्यात येत असलेले आरोप चुकीचे आहेत. सनातन संस्था कधीही असे करणार नाही. सनातन संस्थेतील लोक धार्मिक आहेत. त्यांचा अशा घटनांशी काहीही संबंध असू शकत नाही. मी त्यांच्या पनवेल येथील आश्रमात गेलो आहे. ती धार्मिक आणि साधी माणसे आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचले जात आहे, असेच वाटते. राजकीय कारणामुळे त्यांच्यावर आरोप होत आहेत. जर सरकार असे करत असेल, तर ते अत्यंत अयोग्य आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात