(म्हणे) ‘सनातन संस्थेवर कठोर कारवाई करा !’ – टीपू सुलतान संघर्ष समिती

बेळगाव (कर्नाटक) येथे ‘टीपू सुलतान संघर्ष समिती’कडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

टीपू सुलतान संघर्ष समितीने कधी देशात जिहादी आतंकवादी कारवाया करणार्‍या संघटनांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी निवेदने दिली आहेत का ?

हिंदूंचा वंशसंहार करणार्‍या क्रूरकर्मा टीपूच्या नावाने संघटना काढण्याची अनुमती सरकार कशी काय देते ?

बेळगाव – सनातन संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन येथील टीपू सुलतान संघर्ष समितीकडून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. ‘बेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या देशद्रोही कार्यक्रमांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करावी. त्यांच्याकडून काढण्यात येणार्‍या मोर्च्याला अनुमती देऊ नये, तसेच त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी’, अशा मागण्याही या निवेदनात समितीचे राज्य चिटणीस फजलुद्दीन पठाण यांनी केल्या आहेत. (फजलुद्दीन पठाण यांचा हिंदुद्वेष ! हिंदूंच्या राष्ट्र आणि धर्महिताच्या कार्यक्रमांना देशद्रोही ठरवणारे पठाण त्यांच्या धर्मबांधवांकडून करण्यात येणारे बॉम्बस्फोट, हत्या, दंगली आदींविषयी तोंड का उघडत नाहीत ? कि ‘अशा विघातक गोष्टींना त्यांचा पाठिंबा आहे’, असे समजायचे ? – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात