सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात शेकापचे नेते आणि माजी आमदार श्री. विवेक पाटील यांनाही निवेदन !

श्री. विवेक पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अभय वर्तक आणि अन्य मान्यवर
बैठकीत संबोधित करतांना श्री. अभय वर्तक

पनवेल – येथील शेकापचे लोकप्रिय नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनाही २८ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. या वेळी देवद गावातील ग्रामस्थ श्री. नीलेश वाघमारे, देवद ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. निनाद गाडगीळ, सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे मिलिंद पोशे उपस्थित होते.

जुने पनवेल येथील बालाजी मंदिराजवळील श्रीकृष्ण मंदिर येथे २९ ऑगस्ट या दिवशी हिंदुत्वनिष्ठांची बैठक पार पडली. या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. राजीव समेळ, ह.भ.प सुरेश महाराज पाटील, बालाजी मंदिराचे सचिव श्री. अशोक गील्डा, श्री. नीलेश वाघमारे, अभिनव मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल खुटले, भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगडच्या अध्यक्षा सौ. शितल प्रभाकर सोनावणे, शिवसेनेचे श्री. अच्युत सुदान, वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष श्री. बापू रावकर, देवद येथील समाजसेवक श्री. संदिप वाघमारे

सनातनचे साधक कायदाबाह्य कृती करू शकत नाहीत, याची मला खात्री आहे ! – आमदार विवेक पाटील

सनातनवर बंदी आणू पहाणार्‍यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, गेली अनेक वर्षे मी सनातनचा आश्रम जवळून पाहिला आहे. मी आश्रमातील आणि इतरत्र अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे. ही पुष्कळ चांगली माणसे आहेत. अशी कायदाबाह्य कृती येथील सनातनचे साधक करू शकत नाही, याची मला खात्री आहे. हे सर्व कार्य मी गेली दहा वर्षे जवळून पाहिले आहे. सनातन संस्थेवर बंदी आम्ही येऊ देणार नाही. याला आम्ही पूर्ण ताकदीनिशी विरोध करू.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात