अन्वेषणाच्या नावाखाली विशेष अन्वेषण पथकाकडून पती आणि कुटुंबीय यांचा मानसिक छळ ! – संशयित भरत कुरणे यांची पत्नी सौ. गायत्री कुरणे यांचा आरोप

सनातनवरील संभाव्य बंदीच्या षड्यंत्राच्या विरोधात १ सप्टेंबरला बेळगाव येथे मोर्चा

हिंदुत्वनिष्ठांचा नाहक छळ केल्याची पत्रकार परिषदेत माहिती

डावीकडून सौ. रेखा कुरणे आणि बोलतांना सौ. गायत्री कुरणे

बेळगाव – गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित श्री. भरत कुरणे अन् कुटुंबीय यांचा विशेष अन्वेषण पथकाकडून (एस्.आय.टी.कडून) नाहक मानसिक छळ केला जात आहे, असा आरोप श्री. भरत कुरणे यांच्या पत्नी सौ. गायत्री कुरणे आणि आई सौ. रेखा कुरणे यांनी पत्रकार परिषदेत केला. सनातन संस्थेवर बंदीचे षड्यंत्र आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा नाहक छळ केल्याच्या प्रकरणी १ सप्टेंबरला बेळगाव येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या सौ. गायत्री कुरणे आणि आई सौ. रेखा कुरणे यांनी ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला अधिवक्ता चेतन मेणरीकर, अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. समीर पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. ऋषीकेश गुर्जर आणि  हिंदुत्वनिष्ठ श्री. मारुति सुतार उपस्थित होते.

माझे पती चौकशीसाठी स्वतःहून उपस्थित असतांना
प्रसिद्धीमाध्यमांकडून खोटे वृत्त देऊन अपर्कीती ! – सौ. गायत्री कुरणे

सौ. गायत्री कुरणे पुढे म्हणाल्या, ‘‘प्रसिद्धीमाध्यमे वस्तूस्थिती जाणून न घेताच बातम्या प्रसारित करून आमची अपर्कीती करत आहेत. श्री. भरत हे निर्दोष आहेत, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. माझे पती स्वतःहून चौकशीसाठी उपस्थित झाले असून त्यांना ‘पकडण्यात आले, उचलले’, असे खोटे वृत्त देऊन आमच्या कुटुंबियांची अपर्कीती करत आहेत. अन्वेषण यंत्रणा पतींचा नाहक मानसिक छळ करत आहेत, असे आम्हाला बेळगाव येथून बेंगळूरू येथे चौकशीसाठी घेऊन गेल्यानंतर समजले. बेंगळूरू येथे नेऊन त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला. त्यानंतर सतत बेळगाव येथे त्यांना आणून त्यांच्यासह कुटुंबियांनाही मानसिक त्रास दिला आहे. त्यांची प्रकृती ठीक नाही. ते सतत आजारी पडत आहेत. सध्याही त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. यातच त्यांना पोलिसांकडून मानसिक त्रास चालू आहे. त्यामुळे मानसिक ताण सहन न झाल्यास त्यांना काहीतरी झाले, तर आम्ही काय करावे. मी गरोदर आहे. ‘भरत हे बेंगळूरू येथे जाऊन आले आहेत’, असे अन्वेषण करणार्‍या यंत्रणा म्हणतात; मात्र त्या काळात त्यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी श्री. भरत यांना विश्रांती घेण्यास, तसेच त्यांना मानसिक त्रास, ताण देऊ नका, असे सांगितले होते. त्यामुळे त्या काळात आम्ही त्यांना भ्रमणभाषही दिला नव्हता. मग ते बेंगळूरू येथे कसे जाऊन येतील ? जेव्हा आमच्या घरी अन्वेषण अधिकारी आले, तेव्हा त्यांनी सरळ कारण सांगितले नाही. उगीच आमच्या प्रकृतीची चौकशी करत आमचा आधारकार्ड क्रमांक आणि अन्य कागदपत्रे मागत होते. आम्हाला याविषयी शंका आली होती. त्या वेळी श्री. भरत हे चातुर्मासानिमित्त देवदर्शनासाठी गेले होते. त्यांचा भ्रमणभाष आल्यावर मी आणि आई यांनी सर्व घटना त्यांना सांगितली. त्या वेळी ‘स्वतःहून उपस्थित रहातो’, असे त्यांनी आम्हाला सांगितले होते. त्याप्रमाणे ते पोलिसांकडे अधिवक्त्यांद्वारे उपस्थित झाले. मग असे असतांना ते दोषी कसे असतील ?

श्री. भरत यांच्या आई रेखा कुरणे म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलाला पोलिसांनी अटक केली. त्याशिवाय अन्वेषणाच्या नावाखाली माझ्या दुसर्‍या धाकट्या मुलालाही ४-५ वेळा बेंगळूरूला नेऊन त्याचाही मानसिक छळ करत आहेत.’’

श्री. भरत यांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील, तर ते ऐकण्यासाठीही बेंगळूरू येथे एस्आयटी पथकाचे अधिकारी ५ मिनिटांचाही वेळ देत नाहीत. हे कोणत्या कायद्यात बसते. एस्आयटी पथकाने या घटनेचे अन्वेषण करतांना निष्पापांना त्रास होऊ नये, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन केले. या वेळी अधिवक्ता मणेकरीकर आणि अधिवक्ता श्री. शरदचंद्र मुंदरगी  यांनी कायदेशीर बाजू मांडली.

– अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

पत्रकार परिषदेला उपस्थित वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांची नावे अशी…

१. वृत्तवाहिन्या – ‘साम’ टीव्ही, टीव्ही ५, सुवर्णा न्यूज, टीव्ही ९, आयएन्एन् बेलगाम, सीटी न्यूज, यूएन्आय, एन्यूके, सुद्धी टीव्ही, पब्लिक टीव्ही, बीबीएन् न्यूज, बी टीव्ही, विजय न्यूज, न्यूज १८, ई टीव्ही, प्रजा टीव्ही, न्यूज एक्स, न्यूज २४, दिग्विजय न्यूज, बेलगाम न्यूज डॉट कॉम.

२. वर्तमानपत्रे – दैनिक तरुण भारत, प्रजावाणी, कन्नडाम, कन्नडप्रभा, विश्‍ववाहिनी, कीर्तीवंत, लोकदर्शन, हासीरू क्रांती, पुढारी, सकाळ इत्यादी दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते.

* महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीने भ्रमणभाष करून पत्रकार परिषदेची माहिती मागवून घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात