‘(म्हणे) सनातन संस्था आणि शिवप्रतिष्ठान या संघटना लोकशाहीला घातक ! ‘ – प्रा. मच्छिंद्र सकटे, संस्थापक, दलित महासंघ

कराड (जिल्हा सातारा) – आगामी निवडणुकीत दंगली घडवण्याचे कारस्थान सनातन संस्था आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटना करत आहेत. अशा संस्था लोकशाहीस धोकादायक आहेत. हे थांबवण्यासाठी दोन्ही संघटनांवर बंदी घालावी, ही मागणी करत दलित महासंघ ३ सप्टेंबरपासून राज्यात आंदोलन करणार आहे, असे विधान दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी येथे २७ ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत केले. (स्वत:ला पोलीसयंत्रणा आणि न्यायालय यांपेक्षा अधिक कळते, या आविर्भावात बिनबुडाची विधाने करणारे प्रा. सकटे ! खोटा प्रचार करून सामाजिक सौहार्दाचे वातावरण कलुषित करणार्‍या प्रा. मच्छिंद्र सकटे यांचीच चौकशी करून पोलिसांनी सत्य समाजापुढे आणावे ! – संपादक)

प्रा. सकटे म्हणाले,

१. देशात सध्या अराजक आहे. जातीयवादी शक्तींचा प्रभाव वाढत आहे. (दोन्ही काँग्रेस राज्यातून हद्दपार होऊन भाजप सत्तेत आल्यामुळे, तसेच पुढील वर्षी निवडणुका असल्याने प्रा. सकटेंना अचानक असे वाटण्यास प्रारंभ झाला असावा, अशी शंका कोणाला आल्यास नवल काय ? – संपादक)

२. नालासोपारा प्रकरणात जे तरुण सापडले, ते सर्वजण हिंदुत्ववादी संघटनांसाठी काम करत असल्याचे दिसून येते. त्यात सनातन संस्था आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्याशी संबंधित त्यांचे कार्य होते. या दोन्ही संस्था देशाच्या लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आलीच पाहिजे. (नालासोपारा येथील घटनेशी कोणत्याही संघटनेचा सहभाग नसल्याचे आतंकवादविरोधी पथकाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. असे असूनही आध्यात्मिक संस्था आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याशी या घटनेचा संबंध जोडणारे प्रा. सकटेंची यातून वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते ! – संपादक)

३. बहुजन समाजातील युवकांची धर्मांधतेच्या नावाखाली डोकी भडकवून त्यांना बहुजनांच्या हिताचे विचार मांडणार्‍यांचे खून करायला लावणे म्हणजे मनुवादी शक्तींना आपले राज्य करण्याचे मनसुबे बळकट करण्याचा प्रकार आहे. (राज्य कारभार घटना आणि कायदा यांच्या चौकटीत चालतो, हे ज्ञात असूनही जाणीवपूर्वक समाजात जातीयतेचे विष कालवणारे प्रा. मच्छिंद्र सकटे ! – संपादक)

(म्हणे) जयंत आठवले आणि भिडे यांच्यावर दंगली पेटवल्याचा आरोप आहे !

प्रा. मच्छिंद्र सकटे यांचा धादांत खोटा आरोप !

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे मनोहर भिडे याच प्रकारचे कार्य करतात. त्यांच्यात अन् अतिरेक्यांमध्ये फारसा फरक नाही. (पू. संभाजीराव भिडेगुरुजींचे नावही नीटपणे न घेऊ शकणारे दलित महासंघाचे मच्छिंद्र सकटे म्हणे प्राध्यापक ! – संपादक)त्यांच्यासह मिलिंद एकबोटे, सनातनचे जयंत आठवले यांचीही चौकशी झाली पाहिजे. आठवले, भिडे यांच्यावर चार ते पाच दंगली पेटवल्याचा आरोप आहे. त्यांना पोलिसांनी किमान पाच वेळा दंगली घडू नयेत, यासाठी स्थानबद्ध केल्याच्याही घटना आहेत. (खोटे बोला; पण रेटून बोला या वृत्तीचे प्रा. मच्छिंद्र सकटे ! परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर दंगली पेटवल्याचा कोणताही आरोप नाही, तसेच त्यांना कधी स्थानबद्धही केलेले नाही. असे असतांना धादांत खोटी माहिती पसरवून संतांची अपकीर्ती करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक) नालासोपारा येथे सापडलेल्या बॉम्ब प्रकरणातही त्यांची चौकशी झाली पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात