‘दिशाहीन शासनकर्त्यांच्या लोकशाहीपेक्षा हिंदूंना धर्मनिष्ठ हिंदु राष्ट्र हवे !’ – चेतन राजहंस

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – देशात सुधारणा करण्यासाठी हिंदूंनी निवडून दिलेले शासनकर्ते हिंदूंच्याच मुळावर उठले आहेत. केंद्रातील सरकार अनुसूचित जाती अन् जमाती यांच्या संदर्भात कायदा करून सामाजिक अराजक निर्माण करत आहे. धर्म आणि राजधर्म यांचे धडे न गिरवलेले शासनकर्ते कसे दिशाहीन असतात, हे यावरून सिद्ध होते. अशा दिशाहीन शासनकर्त्यांच्या लोकशाहीपेक्षा हिंदूंना धर्मनिष्ठ हिंदु राष्ट्र हवे आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले. गाझियाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदूसंघटन बैठकीत ते बोलत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात