वर्धा येथे एक दिवसीय युवा शिबिराचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजन

अभ्यासासमवेत साधना करण्यासाठी प्रबळ इच्छा असायला हवी ! – पू. अशोक पात्रीकर

वर्धा – आपल्याला देवधर्म करायला वेळ नाही, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते; परंतु व्यवस्थित नियोजन केले, तर अभ्यासासमवेत आपण देवधर्म म्हणजे साधना करू शकतो. त्यासाठी आपली प्रबळ इच्छा असायला हवी. साधना आपल्याला कायम आनंद देते आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवते. त्यामुळे ती मनाने न करता योग्य शास्त्र जाणून करणे आवश्यक आहे. अष्टांग साधनेने ईश्‍वराविषयी उत्कट भाव निर्माण होतो. ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करतांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे’,असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ ऑगस्ट या दिवशी येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय युवा शिबिरात केले. याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आज राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी आपण जागृत असायला हवे. त्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक यांदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे.’, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी केले.

क्षणचित्रे

१. पू. पात्रीकर काका यांनी या वेळी उपस्थित जिज्ञासू विद्यार्थ्यांना कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप कसा करावा, अनिष्ट शक्तींच्या त्रासावर उपाय कसे करायचे यांविषयी माहिती दिली.

२. कु. गोरी आमझरे हिचा कृतज्ञताभाव जागृत झाला. ती म्हणाली, ‘‘प.पू. गुरुदेवांनीच मला येथे आणले. ते सातत्याने माझ्यासह असतात. अडचणींमध्ये तेच मला साहाय्य करत असतात.’’

शिबिरार्थींचे मनोगत

१. कु. प्रतिक भूते – आज आम्हाला लव्ह जिहादविषयी प्रथमच कळले.

२. कु. साक्षी लालोकर, सेलू – हिंदु जनजागृती समितीचे आम्हाला कळलेले कार्य  इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न करीन.

३. कु. मिनल किरसान – मी लहानपणापासून आध्यात्मिक उपाय करत आहे. तेव्हा मला समाजातील वातावरणाची जाणीव नव्हती. आता ती जाणीव झाली असून उपाय वाढवणे अत्यंत आवश्यक वाटते.

४. सौ. युगा मोहन झाडे – आपण सगळ्यांनी न्यूनतम १० युवकांना साधनेचे महत्त्व सांगितले, तर मोठे संघटन होऊ शकते. अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करायला हवे.

५. नेहा सचिन हस्ती – आपल्याकडून चुका कशा होतात, हे लक्षात आले. नामजपातील अडथळे दूर होण्यासाठी करायचे आध्यात्मिक उपायही कळले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात