सनातन संस्थेवरील बंदीला आम्ही विरोध करू ! – रवि राणा, अपक्ष आमदार, अमरावती

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर संभाव्य बंदीचे प्रकरण

प्रतिकूल परिस्थितीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पाठीशी खंबीरपणे रहाणार्‍या हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींचे आभार !

(डावीकडून दुसरे) रवी राणा यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

अमरावती – सनातन संस्थेवर बंदी येऊ नये; म्हणून मी शासन दरबारी संबंधितांशी बोलतो. तुम्हीही माझ्यासमवेत मंत्रालयात या. तुम्ही शासनाला विषय समजावून सांगा. मीही स्वतः संबंधित मंत्र्यांशी व्यक्तीश: बोलतो. सनातन संस्थेचे कार्य मी जवळून पाहिलेले आहे. तुमच्यासारख्या राष्ट्रवादी विचारांच्या संघटनेवर जर विरोधकांच्या सांगण्यावरून बंदी आणली जाणार असेल, तर उद्या हे लोक आमच्यावरही आघात करण्यास मागेपुढे पहाणार नाहीत. त्यामुळे आम्ही सनातनवरील बंदीला विरोध करू, असे आश्‍वासन अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील अपक्ष आमदार श्री. रवि राणा यांनी दिले.

आमदार श्री. राणा यांची त्यांच्या कार्यालयात त्यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे, अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे आणि सनातन संस्थेचे श्री. हेमंत खत्री यांनी त्यांना निवेदन दिले. लोकांची गर्दी असतांनाही आमदार महोदयांनी प्राधान्याने वेळ देऊन समितीचे कार्यकर्ते आणि संस्था यांचे म्हणणे ऐकूण घेतले.

जलाशयात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि कागदी लगद्यापासून मूर्ती करणार्‍यांवर कारवाई करावी, यासाठीच्या मागण्यांचे निवेदन या वेळी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून हौद न बांधता तो निधी शाडूच्या गणेशमूर्तींची निर्मिती करणार्‍या मूर्तींकारांना अनुदान म्हणून द्यावा. तसेच जलाशय आणि तलावात लोखंडी तारेच्या जाळीने तयार केलेली दगडी भिंत बांधून त्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. तसेच कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बंदी आणली आहे; मात्र शासनाने त्याची कार्यवाही न केल्यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर कागदी लगद्यापासून बनवलेल्या प्रदूषणकारी मूर्ती बाजारात विक्रीसाठी आलेल्या आहेत. त्या संदर्भात उचित कारवाई करण्यासाठी शासनाला भाग पाडावे, अशा मागण्यांची दोन निवेदने समितीच्या वेळी आमदार श्री. राणा यांना देण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, मी स्वतः या संदर्भात अमरावती महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासन यांना पत्र लिहून कळवतो. तसेच तुम्हाला त्या पत्राची एक प्रत देतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात