सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याच्या षड्यंत्राचे हे पुढचे पाऊल ! – अधिवक्ता संतोष दुबे, जिल्हा सहमंत्री, विश्‍व हिंदु परिषद, मुलुंड

निधर्मी लोकांना हे ठाऊक आहे की, सनातन संस्था हिंदु धर्मासाठी अग्रक्रमाने कार्य करत असल्यानेे हिंदूंमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक हिंदुद्वेषी लोक संस्थेची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वीही एखाद्याच्या घरामध्ये अमली पदार्थ ठेवून त्याला फसवण्याचे प्रकार झाले आहेत. वैभव राऊत यांच्या संदर्भातही हाच प्रकार झाला आहे. सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे. जी संस्था किंवा संघटना हिंदु धर्माचे कार्य करण्यासाठी पुढे येत आहेत, त्यांची अपकीर्ती करून त्यांच्या कार्यात बाधा आणण्याचे काम निधर्मी लोक करत आहेत. सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचे हे पुढचे पाऊल आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात