नालासोपारा येथील प्रकरण हा दहशतवाद नाही ! – वाय.सी. पवार, निवृत्त पोलीस सहआयुक्त

‘एबीपी माझा’ या वाहिनीवरील रात्रीच्या सत्रातील ‘स्फोटक
साधना करणार्‍यांचे मास्टरमाईंड कोण ?’ या विषयावरील चर्चासत्र

मुंबई – नालासोपारा येथील प्रकरणाला मी दहशतवाद म्हणणार नाही; कारण दहशतवादी म्हणजे देशविघातक कृत्ये करणारा. या लोकांना कसलीतरी चीड येते किंवा एखाद्या गोष्टीचा बदला म्हणून छोटासा प्रयत्न केला जातो; मात्र त्याचा कुठेही परिणाम होत नाही. त्यामुळे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. दहशतवादाची व्याख्या स्पष्ट आहे. त्यामुळे मला ‘हा दहशतवाद आहे’, असे वाटत नाही, असे प्रतिपादन निवृत्त पोलीस सहआयुक्त वाय.सी. पवार यांनी केले. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवरील रात्रीच्या सत्रातील ‘स्फोटक साधना करणार्‍यांचे मास्टरमाईंड कोण ?’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

या वेळी हिंदु गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. दीप्तेश पाटील, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. पराशर मोने, एम्आयएम्चे अधिवक्ता वारिस पठाण आणि मालेगाव प्रकरणातील अधिवक्ता गणेश सोवनी उपस्थित होते.

सूत्रसंचालक प्रसन्न जोशी यांची हिंदुद्वेषी विधाने !

१. दीप्तेश पाटील हे श्री. वैभव राऊत यांच्या निर्व्यसनीपणाविषयी सांगत असतांनाच सूत्रसंचालक श्री. प्रसन्न जोशी यांनी ‘नथुराम निर्व्यसनी होता’, असे विधान करून स्वतःतील हिंदुद्वेष दर्शवला.

२. श्री. दीप्तेश नालासोपारा परिसरातील कसायांविषयी सांगत असतांना प्रसन्न जोशी यांनी विचारले, ‘‘ते हिंदू कसाई होते का ?’’ यावर श्री. पाटील यांनी प्रत्युत्तर दिले, ‘‘कसाई हिंदू नसतात.’’ मग कसाई कोण होते’, असा प्रश्‍न जोशी यांनी विचारल्यावर श्री. दीप्तेश उत्तरले, ‘‘ते तुम्ही शोधा.’’

सनातन संस्थेची आतापर्यंत सर्व अन्वेषण यंत्रणांनी चौकशी करूनही सनातनचे निर्दोषत्व पुन:पुन्हा सिद्ध झाले आहे. गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही लोकसभेत ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नाही’, असे स्पष्ट केले आहे.

(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्याने
तिच्यावर बंदी हवीच !’ – अधिवक्ता वारिस पठाण, एम्आयएम्

१. सनातन ही आतंकवादी संघटना असून ती लोकशाहीला मानत नाही. ही संघटना गायीच्या नावावर मुसलमान आणि दलित लोकांची हत्या करते.

२. आतापर्यंत सनातन दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या आहेत. त्यामुळे अशा संघटनेवर बंदीच आणायला हवी. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला बंदीविषयी सांगितले आहे, मग बंदीला कोण रोखत आहे ? यांच्या विरोधात पुरावे आहेत, मग बंदी का येत नाही ? यांच्यामुळेच राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत आहे.

अधिवक्ता वारिस पठाण यांची विधाने म्हणजे न्याव्यवस्थेशी केलेली प्रतारणा !

अधिवक्ता वारिस पठाण यांच्या विधानांचे खंडण करतांना श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या ही न्यायप्रविष्ट प्रकरणे आहेत. त्यामुळे वारिस पठाण यांची विधाने म्हणजे न्याव्यवस्थेशी केलेली प्रतारणा आहे. त्यांनी सनातन संस्थेची अब्रूनुकसानी केल्याप्रकरणी आम्ही अधिवक्त्यांचा सल्ला घेऊ. त्यांनी आमची क्षमा मागायला हवी. राष्ट्रीय सुरक्षा कोणामुळे धोक्यात येत आहे, ते ठाऊक आहे. अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलेले विधान सर्वांनाच ठाऊक आहे.’’

पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे आतंकवादी कृत्याचे कधीही समर्थन करत नाहीत. कुठल्याही संघटनेतील संबंधित आरोपी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. – पराशर मोने, श्री, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

सूत्रसंचालकांच्या प्रश्‍नांना श्री. चेतन राजहंस यांनी दिलेली रोखठोक उत्तरे !

श्री. चेतन राजहंस

१. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या संघटना हिंदुत्वाच्या सूत्रावर एकत्र येत असतील, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. त्यामुळे त्या संघटनांचा वेगळा संबंध जोडण्याची आवश्यकता नाही.

२. सूत्रसंचालकाने वैभव राऊत यांच्या प्रकरणाचा सनातनशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला; मात्र श्री. राजहंस यांनी ‘गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी सनातनचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तुम्ही घाईघाईने या प्रकरणाला सनातनशी जोडण्याचा प्रयत्न करत आहात’, असे त्यांना सुनावले.

३. सूत्रसंचालक यांनी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या संघटनांचे गठबंधन नक्की कोणत्या प्रकारचे आहे ?’, असा प्रश्‍न विचारला. त्यावर श्री. राजहंस म्हणाले, ‘‘हे हिंदुत्वाचे गठबंधन आहे !’’ त्यावर सूत्रसंचालक निरुत्तर झाले.

४. सूत्रसंचालकांनी सुधन्वा गोंधळेकर यांचा लेख सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे सनातनशी गठबंधन शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र श्री. राजहंस यांनी ‘श्री. सुधन्वा गोंधळेकर हे सनातन प्रभातचे वाचक आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेला लेख आम्ही प्रसिद्ध केला’, असे सांगून ‘वेगळे गठबंधन शोधण्याची आवश्यकता वाटत नाही’, असेही मार्मिकपणे सांगितले.

५. सूत्रसंचालकांनी ‘जर सनातनमधील कुणी दोषी आढळल्यास तुम्ही त्यांच्याशी सहकार्याचे संबंध ठेवणार का ?’, असे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. मोने यांना विचारल्यावर ते ‘नाही’ असे म्हणाले. त्यावर सूत्रसंचालकाने पुन्हा ‘एकटी पडणारी सनातन याकडे कसे पहाते’, असा प्रश्‍न विचारला; मात्र श्री. राजहंस यांनी त्यांना ‘सनातन अजून कोणत्याही प्रकरणात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात सनातनचे नाव आलेले नाही’, असे समर्पक उत्तर दिले. (सनातन संस्था ही ईश्‍वरनिष्ठ संघटना असल्याने ती कधीही एकटी पडणार नाही, हे सनातनद्वेष्ट्यांनी कायमच लक्षात ठेवावे ! – संपादक)

श्री. राजहंस यांचे प्रत्येक उत्तर समर्पक, रोखठोक आणि सडेतोड असल्यामुळे सूत्रसंचालक निरुत्तर होत होते.

 

‘टीव्ही ९’कडून गोरक्षक वैभव राऊत यांची
जनप्रबोधनाची जुनी चलचित्रे विकृत स्वरूपात दाखवून त्यांची अपकीर्ती !

मुंबई – ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीकडून गोरक्षक श्री. वैभव राऊत जनप्रबोधन करत असतांना त्यांची ध्वनीचित्रमुद्रित केलेली जुनी चलचित्रे (व्हिडिओ) विकृत स्वरूपात दाखवून त्यांची अपकीर्ती करण्यात येत होती. त्यात श्री. राऊत एका महाविद्यालयामध्ये प्रबोधन करत असतांना महाविद्यालयातील पदाधिकार्‍यांनी त्यांना कशाप्रकारे प्रश्‍न विचारून कोंडीत पकडले ?, ‘कोणते कपडे घालावेत’, याविषयी महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शन करत असतांना मुलींनी त्यांना कसे प्रश्‍न विचारून भंडावून सोडले, अशा प्रकारे या चलचित्राचे प्रसारण करतांना सूत्रसंचालकाकडून सांगण्यात येत होते.

(श्री. राऊत हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ होते आणि त्यांनी हिंदु संस्कृतीचा प्रसार केला; मात्र वृत्तवाहिन्यांकडून काही तरी खुसपट काढून त्यांना ‘कट्टरवादी’, ‘आतंकवादी’ दाखवण्याचा आटापिटा केला जात आहे. यातून वृत्तवाहिनीचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक)