एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेत कार्य करणार्‍या कार्यकर्त्याला सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर सनातन आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांत जाणवलेला भेद

 

‘मी लहानपणापासून एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेत कार्यकर्ता होतो. मी महाविद्यालयीन आयुष्य त्या संघटनेच्या उपशाखेत व्यतीत केले. त्या वेळी मला विविध पदांचे दायित्व मिळाले, उदा. महाविद्यालयीन प्रमुख, शहर प्रमुख (शहर संयोजक) इत्यादी.

 

१. मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेत कार्य करतांना आलेले कटू अनुभव

अ. आपापसात स्पर्धा, स्वतःची प्रसिद्धी, एका राजकीय पक्षाकडून निवडणुकीचे तिकिट मिळवण्यासाठी काही अनुषंगिक संघटनांचा अपलाभ करून घेणे

आ. उच्च पदाधिकार्‍यांनी अहिंदु व्यक्तींशी व्यवसाय करणे, भागीदारी करणे

इ. गोरक्षा करण्याऐवजी पैसे घेऊन गोवंश असलेली गाडी सोडणे

ई. साधनेचा पाया नसणे, ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, ते ठाऊक नसणे

उ. कार्यकर्त्यांना ‘अन्य कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या समारंभास जाऊ नये’, असा दृष्टीकोन दिला जाणे

 

२. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य

अ. सर्व संघटनांना समवेत घेऊन कार्य करणे

आ. येथे पद आणि अधिकार अशी पद्धत नसणे

ई. कार्याला साधनेची जोड दिली जाणे’

– एक हिंदुत्वनिष्ठ

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य ईश्‍वराच्या आशीर्वादाने चालू असल्याने काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना करतात, तसे कोणाला एखाद्या पदाची किंवा इतर कसली लालूच दाखवून संस्थेमध्ये आणण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. जे कोणी आपली संघटना सोडून सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सहभागी होतात, ते केवळ त्यांचे कार्य आवडल्यामुळे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले