‘कुणी तयार केला हा हिंसक जमाव ?’, ‘ही खुनी झुंड येते कुठून ?’ आदी निरागसतेचा बुरखा पांघरलेल्या निखिल वागळे यांच्या प्रश्‍नांची पोलखोल !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘अक्षरनामा’ नावाच्या संकेतस्थळावर पत्रकार निखिल वागळे यांनी ‘ही खुनी झुंड येते कुठून ?’, या शीर्षकाखाली एक लेख लिहिला आहे. त्याचसमवेत ‘मॅक्स महाराष्ट्र’ नावाच्या ‘फेसबूक’ खात्यावर ‘कुणी तयार केला हा हिंसक जमाव ?’, या शीर्षकाखाली एक चलचित्र (व्हिडिओ) प्रसारित केले आहे. वागळे यांचे लेख आणि चलचित्र यांमधील विधाने हृदयाच्या तळापासून आल्यासारखी वाटावीत, असा एकंदरीत त्यांचा पवित्रा आहे. निरागसता आणि निष्पापपणा यांचा उत्तम आव वागळे यांनी आणला आहे.

जर्मनीच्या पाडावानंतर इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेने कित्येक नाझी अधिकार्‍यांना लॅटिन अमेरिका आणि युरोपातील काही देशांतून शोधून काढले अन् लाखो ज्यूंच्या शिरकाणाला कारणीभूत असल्याचा आरोप ठेऊन त्यांना फासावर लटकावले. ज्या गोबेल्सच्या प्रचारतंत्रामुळे लाखो ज्यूंचे शिरकाण झाले, तो यदा कदाचित् एखाद्या देशात अभय मिळवून जिवंत राहिला असता, तर त्याने नाझी अधिकार्‍यांच्या मृत्यूदंडाविषयी निश्‍चितच मानवाधिकारांचा भंग, एका देशाने दुसर्‍या देशाच्या सार्वभौमत्वात ढवळाढवळ करणे, जर्मनांविरोधात वांशिक मोहीम चालवणे, अधिकार्‍यांच्या खटल्यामध्ये नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन न करणे, यांसारखे आरोप मानभावीपणे इस्रायलवर केले असते. लाखो ज्यूंचे शिरकाण झाले आणि त्याची प्रतिक्रिया इस्रायलने दिली, ही गोष्ट त्याने बेमालूमपणे मांडली नसती. कदाचित् काही उथळ व्यक्तींना गोबेल्सच अधिक भावला असता; कारण एकूण इतिहासाची जाणीवच त्यांना नाही. वागळे यांचे वर्तन गोबेल्ससारखे आहे. ‘खोटे बोला, रेटून बोला, सतत बोला’ या मंत्राचा जप करत आयुष्यभर वागळे आणि त्यांच्या टोळीने द्वेष पसरवला. ‘विद्रोही’ म्हणवणारी चळवळ कमालीची विद्वेषी आणि विद्रूप बनून गेली. आज बहुविधता नष्ट होण्याविषयी किंवा असहिष्णुता वाढण्याविषयी वागळे गळा काढत आहेत; परंतु ज्याप्रकारे त्यांच्यासारखा एखादा अपवाद वगळता ज्यांचे पूजन वागळे करतात, अशा प्रत्येक विद्रोही विचारवंताने समाजात द्वेष, वैचारिक हिंसा आणि सांस्कृतिक आतंकवाद कसा पसरवला आहे, हे लोकांसमोर मांडले पाहिजे.

१. मराठी साहित्याची अधोगती करणार्‍यांच्या विरोधात निखिल वागळे यांनी टीका न करणे

पु.भा. भावे हे मराठीमधील सर्वोच्च १०-१५ लेखकांमध्ये गणले जातात. त्यांच्या अध्यक्षतेखाली भरवलेले साहित्य संमेलन उधळण्यात विद्रोही विचारवंतांनी पुढाकार घेतला. विद्रोह्यांनी लाठ्या-काठ्या, दगड, सळी हाती घेऊन शेकडोंच्या जमावाने संमेलनावर आक्रमण केले. त्यात साहित्यिकांना मारहाण झाली, शेकडो पुस्तके जाळली आणि फाडली. पु.भा. भावे यांना स्वतःचे अध्यक्षीय भाषणदेखील वाचू दिले नाही. डॉ. कुमार सप्तर्षि, एस्.एम्. जोशी, नानासाहेब गोरे, डॉ. बाबा आढाव या प्रत्येक व्यक्तीने या झुंडीचे ‘क्रांतीकारी’ म्हणून कौतुक केले. पुढे पुढे ‘जातीनिहाय अध्यक्षाची निवड व्हायला हवी’, असा प्रवाहदेखील याच मंडळींनी रूढ केला. यातून मराठी साहित्य विश्‍वाची अधोगती होत गेली आणि डॉ. श्रीपाल सबनीस अन् लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सारख्यांना अध्यक्षपदाचा मान मिळू लागला. ज्यांचे १०० चाहतेदेखील महाराष्ट्रात नसतील, असे हे साहित्यिक महाराष्ट्राला सहिष्णुतेचे धडे देऊ लागले. निखिल वागळे यांच्यासारख्या विकृत विचारसरणीच्या व्यक्तींनी अशा प्रवृत्तींना कधीही टिकेचे लक्ष्य बनवले नाही. उलट त्यांचे कौतुकच केले.

२. कोरेगाव भीमा येथील दंगलीत झालेल्या मराठा युवकाच्या हत्येविषयी ‘ब्र’ही न काढणारे निखिल वागळे !

महाराष्ट्रात दोन समाजांमध्ये दंगे झाले असून जातीय आणि धार्मिक हिंसाचारही झालेला आहे. दोन भिन्न समाज समोरासमोर भिडणे देशभरात घडते, याला महाराष्ट्रही अपवाद नाही; मात्र एखाद्या झुंडीने एकट्या-दुकट्या, नि:शस्त्र आणि निष्पाप अशा व्यक्तीला त्याचे नावदेखील ठाऊक नसतांना हिंस्रपणे गाठून मारण्याची एकमेव घटना म्हणजे कोरेगाव भीमा येथे राहुल फटांगळे या मराठा जातीतील युवकाची झुंडीने केलेली निर्घृण हत्या ! या हत्येविषयी वागळे यांच्यासह एकही विचारवंत बोलायला सिद्ध नाही. छत्रपती शिवरायांचे चित्र असलेला वेश घालणे, हा राहुलचा एकमेव अपराध होता.

३. हिंदूंमध्ये फूट पाडणे आणि त्यांना एकमेकांविरुद्ध लढवत ठेवणे, हाच विद्रोहींचा एकमेव कार्यक्रम !

‘ईश्‍वर-अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान’, अशी देशाची थोर परंपरा असल्याविषयी वाहिन्यांवर भावपूर्ण बोलणारे अधिवक्ता असीम सरोदे श्री अंबाबाई आणि श्री महालक्ष्मी या पूर्णत: भिन्न आहेत; म्हणून कोल्हापूरच्या देवीचा ‘श्री महालक्ष्मी’, असा उल्लेख करणार्‍यांविरुद्ध हिंसक भूमिका घेणार्‍या झुंडीच्या विरोधात एकही शब्द बोलत नाहीत. ‘श्रीकृष्ण आणि विठ्ठल वेगळे आहेत’, ‘तिरुपती हा द्रविडांचा देव आहे’, ‘शैव हे द्रविडपंथीय असल्याने ब्राह्मण्यवादी वैष्णवांच्या श्रीराम आणि श्रीकृष्ण या देवतांची उपासना करू नका’, अशी विद्वेषी शिकवण देणार्‍या व्यक्ती हिंदु-मुसलमान संघर्षाचा प्रश्‍न आल्यावर ‘ईश्‍वर एकच आहे आणि म्हणून अल्ला काय किंवा जिझस काय यांनाही हिंदूंनी पुजायला हरकत नाही’, अशी एकाएकी समंजस भूमिका घ्यायला लागतात. थोडक्यात हिंदु धर्मियांमध्ये फूट पाडणे आणि हिंदूंना एकमेकांविरुद्ध लढवत ठेवणे, हाच या विद्रोहींचा एकमेव कार्यक्रम असतो.

४. प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी शाहू आणि फुले यांना पुढे
करून ‘फोडा आणि राज्य करा’ याचा अवलंब करणारे जातीयवादी !

अलीकडेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे काही अल्पवयीन मुलांना खासगी विहिरीत पोहल्याकारणाने मारहाण झाली. ‘शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला हे लज्जास्पद आहे’, अशी टकळी लावणार्‍या एकाही निधर्मी विचारवंताने ‘शिवरायांच्या महाराष्ट्राला हे लज्जास्पद आहे’, असे म्हटले नाही. ज्या वेळी ‘जय शिवाजी जय भवानी’चा नारा दिला जातो किंवा शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केला जातो, त्या वेळी त्यास ‘ब्राह्मणी प्रचार’ असे संबोधून ‘शिवराय हे रयतेचे नेते होते आणि जातीभेद नष्ट करण्यात आद्य पुढाकार त्यांचाच होता’, असे आवर्जून सांगणारी ही मंडळी जामनेर प्रकरणात शिवरायांचा दाखला देत नाहीत. ‘शिवरायांची उत्तुंगता पहाता शिवरायांच्या जागी शाहूंची प्रतिष्ठापना करण्यासाठी ही मंडळी उत्सुक का असतात’, हे त्यांनी सांगावे.

शिवरायांच्या चित्राचा वेश परिधान केल्यावरून राहुल फटांगळे याला दगडांनी ठेचून मारले. जर शिवराय खरोखरच संभाजी भगत यांच्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, या नाटकातील व्यक्तीरेखेप्रमाणे होते, तर मग हेच नाटक डोक्यावर घेऊन नाचणार्‍या विद्रोहींनी राहुल फटांगळे याला ठेचून का मारले ? ६ डिसेंबरला जो भीमसागर चैत्यभूमीवर येतो, त्यांना त्या वेळी शिवराय का आठवत नाहीत ? थोडक्यात हिंदवी स्वराज्याचे प्रतीक म्हणून शिवरायांचा आदर्श स्वीकारून हिंदु समाज एकत्र येऊ लागला की, शिवरायांवर ‘बहुजनवादी किंवा कुणब्यांचा राजा’, अशी नामाभिधाने लावून जातीयवाद मध्ये आणायचा आणि ‘शिवरायांना सर्व समाजाने अजिबात स्वीकारू नये’, या दृष्टीकोनातून ‘प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी शाहू आणि फुले यांना पुढे करायचे’, असे हे ‘फोडा अन् राज्य करा’, यांचे धोरण आहे.

५. मुंबईतील लाखो धर्मांधांमुळे नाही, तर काही सहस्रो
ब्राह्मणांमुळे समाजात दुही पसरते, असे म्हणणारे निखिल वागळे !

मुंबईत आझाद मैदान येथे रझा अकादमीने रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ प्रचंड मोठा दंगा केला. रोहिंग्या मुसलमानांचा भारताशी संबंध नाही. ही जमात आतंकवादी असल्यामुळे बांगलादेश आणि म्यानमार (ब्रह्मदेश) हे दोन्ही देश या जमातीला एकमेकांकडे ढकलू पहात आहेत. मुसलमान निर्वासितांचे उघड स्वागत करणारे युरोपातील देशही या जमातीला आश्रय द्यायला बिचकत आहेत. जर्मनीमध्ये अशा निर्वासितांना आश्रय देण्याच्या प्रश्‍नावर सरकार कोसळेल कि काय ?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्वासित म्हणवून घेत मजल दरमजल करत असतांना वाटेत अन्य जमातींची अथवा समाजाची जी कुटुंबे आली, त्यांचे शिरकाण करून आणि त्यांची संपत्ती लुबाडून रोहिंग्यांनी बांगलादेश अन् ब्रह्मदेश येथे दहशत निर्माण केली. अलीकडेच म्यानमारमधील उत्खननात रोहिंग्यांनी पुरलेले हिंदु परिवारांचे शेकडो मृतदेह सापडले. ही गोष्ट आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही मान्य केली आहे. अशा रोहिंग्यांच्या समर्थनार्थ झालेल्या मुंबई येथील दंग्यात धर्मांधांनी पत्रकारांना लक्ष्य केले. कित्येक पत्रकारांना अमानुष चोपले. वाहिन्यांच्या एका प्रसारण (ओबी) व्हॅनचे मूल्य काही कोटी रुपये असते. अशी ६ वाहने धर्मांधांनी नष्ट केली. महिला पोलिसांचा विनयभंग केला. खासगी वाहने आणि संपत्ती यांची प्रचंड हानी केली. ‘अमर जवान’ ज्योत उद्ध्वस्त केली. धर्मांध आणि आतंकवादी समूहाच्या समर्थनार्थ झालेला प्रचंड दंगा हा गेल्या दोन शतकांतील सर्वांत मोठा दंगा होता. एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांना मारहाण होणे आणि वाहिन्यांच्या प्रसारण व्हॅन जाळणे, हे आजवर कधीही घडलेले नव्हते.

निखिल वागळे, कन्हैय्याकुमार, उमर खलिद यांच्या लेखी आझाद मैदानातील दंगेखोर ‘झुंड’ संज्ञेत बसत नाहीत. त्यामुळे त्यांचा उल्लेख ते ‘आंदोलनकर्ते’, असा करतात. या दंग्यावर वागळे यांनी ‘फेसबूक’ अथवा ‘ट्विटर’वर साधे लिखाणही कधी प्रसारित केले नाही. मग वाहिन्यांवर घंटाभर चर्चा करणे तर दूरच राहिले. आझाद मैदानात हातात दगड, सळ्या, ‘हॉकी स्टीक’ आणि ‘पेट्रोल बॉम्ब’ घेऊन जवळजवळ ६० सहस्र धर्मांध युवक जमा झाले. त्यांच्या परिवारातील व्यक्तींची संख्या ध्यानात घेतल्यास एकट्या मुंबई शहरातच साधारणपणे साडेतीन ते चार लाख देशद्रोही वास्तव्य करून आहेत आणि त्यांना भारतीय समाज उद्ध्वस्त करायचा आहे, ही जाणीव भयावह आहे. वागळे यांना मात्र याचे भय वाटत नाही. ‘मुंबई शहरात निवास करणार्‍या आणि मध्यमवर्गीय जीवन जगणार्‍या ३५ ते ४० सहस्र ब्राह्मणांमुळे समाजात दुही पसरते’, असा स्वतःचा आवडता सिद्धांत ते कुरवाळत बसले आहेत.

६. मनुस्मृतीच्या चिकित्सेची मागणी करणार्‍यांना राज्यघटनेचीही चिकित्सा व्हायला हवी, ही भूमिका मान्य नसणे

अलीकडेच ‘अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि नोकरीसाठी अनुसूचितांना आरक्षण मिळणार नाही’, असा न्यायालयाचा निर्णय झाला आहे. हा निर्णय मनुस्मृतीवर आधारित नाही. राज्यघटनेत ज्या त्रुटी राहून गेल्या आहेत, त्याचा हा परिणाम आहे. मनुस्मृतीची चिकित्सा व्हायला हरकत नाही. अनुसूचितांवर अन्याय होत असेल, तर राज्यघटनेचीही चिकित्सा व्हायला हवी, हीच खरी भूमिका विद्रोही आहे, हेच वागळे यांना मान्य नाही. काश्मीरमध्ये घटनेच्या कलम ३७० मुळे अनुसूचितांना राखीव जागा मिळत नाहीत; परंतु कलम ३७० ची चर्चाच होऊ न देण्यासाठी उमर खालिदसारखे धर्मांध मनुस्मृतीचा दाखला देत रहातात आणि वागळेंसारखे लाचार (अ)विचारवंत उमर खालिदची ‘री’ ओढत रहातात. ‘ब्राह्मण हे बहुजन समाज आणि अनुसूचित यांना वापरतात’, असे प्रतिपादन करणारे वागळेंसारखे (अ)विचारवंत उमर खालिदच्या दावणीला अनुसूचितांना नेऊन बांधतात.

‘पू. संभाजी भिडेगुरुजींचे मूळ नाव काय होते ?’, ‘ब्राह्मण आपल्या मुलांची नावे संभाजी का ठेवत नाहीत ?’, यांसारखे प्रश्‍न विचारणारे विद्रोही असाच प्रश्‍न त्यांच्या मुसलमान कॉम्रेडना विचारत नाहीत. डॉ. दाभोलकर यांनी स्वतःच्या मुलाचे नाव हमीद ठेवले. हमीद दलवाई यांना मुले होती कि नाही ?, हे मला माहिती नाही; मात्र एकाही विद्रोह्याने स्वतःच्या मुलाचे नाव नरेंद्र ठेवलेले नाही, ही माझी निश्‍चिती आहे.

७. भुजबळांसारख्या नेत्याने पगडी घातल्यास ‘जातीच्या
वरिष्ठतेला बाट लागतो’, अशी घमेंड आहे का ?, याची चिकित्सा होणे आवश्यक !

‘भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याने फुले पागोटे घालायचे, पुणेरी पगडी ब्राह्मणांशिवाय इतरांनी घालू नये आणि शिवरायांचा फेटा फक्त मराठ्यांनीच परिधान करायचा’, अशी दुही जर समाजात कुणी माजवत असेल, तर तो खचितच देशद्रोही आणि हिंसक विचारसरणीचा आहे, यात काय शंका ? गंमत अशी आहे की, पुरोगाम्यांच्या कळपात ब्राह्मण, मराठा, ओबीसी, अनुसूचित अशा कुठल्याही समाजातील व्यक्ती सहभागी झाली, तर अशा व्यक्तीला आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी ‘इस्लामी पद्धतीची गोल टोपी घातलीच पाहिजे’, असा दंडक महाराष्ट्रातील तथाकथित विचारवंतांनी घातला आहे. ‘ब्राह्मण्य नष्ट करायचे, तर सर्वांनीच पुणेरी पगडी घालावी’, असे का म्हणू नये ? ‘सर्वांनी गांधी टोपी घालावी’, असेदेखील म्हणायची यांची सिद्धता नाही. थोडक्यात टोपीचा उपयोग समाज तोडण्यासाठी यांना करायचा आहे. भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याने पगडी घातल्यास आणि तीदेखील आपल्या समोर घातल्यास ‘आपल्या जातीच्या वरिष्ठतेला बाट लागतो’, अशी घमेंड यांच्या मनात आहे का, याचीदेखील चिकित्सा व्हायला हवी.

८. शिवरायांविषयी द्वेष पसरवणे आणि त्यांचेच नाव घेऊन
मराठ्यांमध्ये ब्राह्मणांविरुद्ध द्वेष पसरवणे, हे संधीसाधू राजकारण्यांचे धोरण !

छत्रपती शिवरायांचा ध्वज भगवा होता. ‘भगवा हा त्यागाचा रंग आहे’, असे सांगून हिंदुत्वाशी त्याची नाळ तोडू पहाणार्‍या ब्रिगेडी नेत्यांना ज्या वेळी मुसलमानांसह एकाच मंचावर यायचे असते, त्या वेळी भगवा फेटा घालण्याचे त्यांचे धाडस होत नाही. त्याऐवजी रंगीबेरंगी फेटे घातले जातात. थोडक्यात ‘भगवा फेटा घालून ब्राह्मण, मराठा, ओबीसी, अनुसूचित अशा सर्व समाजातील व्यक्ती एकत्र येत असतील, तर ते होऊ द्यायचे नाही आणि त्यानंतर त्याच भगव्याची विटंबना करायची’, असे हे विद्वेषी कारस्थान आहे. जर शिवराय बहुजनांचे नेते होते आणि पहिले निधर्मी राजे होते, तर पुणेरी पगडीवरून आकाश-पाताळ एक करणार्‍या संधीसाधू राजकारण्यांना भगव्या फेट्याची एवढी धास्ती का वाटते ? आजवर एकाही समारंभात त्यांनी भगवा फेटा परिधान केल्याचे दिसून येत नाही. काही समारंभात मुसलमानांची गोल टोपी मात्र त्यांनी आवर्जून घातली आहे. थोडक्यात ‘शिवरायांविषयी द्वेष पसरवायचा आणि त्यांचेच नाव घेऊन मराठ्यांमध्ये ब्राह्मणांविरुद्ध द्वेष पसरवत रहायचा’, असे यांचे धोरण आहे.

९. ख्रिस्ती शाळा किंवा मदरसे यांमध्ये बहुविधता असता कामा नये, असा वागळे यांचा अट्टाहास का ?

दाढी ठेवली किंवा बुरखा घातला म्हणून एखाद्यास वेगळी वागणूक मिळाली, तर देशाच्या बहुविधतेस धोका निर्माण होतो, असे निखिल वागळे यांचे मत आहे. एखाद्या ख्रिस्ती शाळेत कुंकू लावले किंवा हाताला मेंदी लावली म्हणून विद्यार्थिनीची हकालपट्टी केली, तर ते मात्र वागळे यांना शिस्तीचे वाटते. ख्रिस्ती शाळेत किंवा मदरशामध्ये बहुविधता असता कामा नये, असा त्यांचा अट्टाहास का ?

१०. ‘मुसलमानांवर आक्रमण झाले, तरच आक्रमणकर्त्यांना झुंड म्हणायचे’, अशी वागळे यांची निधर्मी विचारसरणी !

‘गोरक्षकांना झोडपून काढतांना ‘माझ्या जेवणाच्या थाळीत काय आहे किंवा माझ्या स्वयंपाकघरात काय होत आहे’, याची उठाठेव करू नका’, असे म्हणणारे वागळे ‘डॉ. दाभोलकर यांच्या नादाला लागून हिंदूंच्या देवघरात काय आहे किंवा काय असावे’, याविषयी अद्वातद्वा बोलणार्‍या दाभोलकरी विचारांच्या मूर्ख वक्त्यांना निर्लज्जपणे समर्थन देतांना उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. गांधीवधानंतर झुंडीने ब्राह्मणांवर आक्रमणे केली. इंदिराजींच्या निर्घृण हत्येनंतर शिखांचे शिरकाण झाले. याच झुंडीने पुढे शिस्तबद्ध राजकीय पक्षाचा मुखवटा धारण केला आणि जातीय राजकारणाचा पुरस्कार केला. वागळेसारख्यांच्या लेखी ही सगळी जनप्रतिक्रिया होती. ‘फक्त मुसलमानांवर आक्रमण झाले, तर आणि तरच आक्रमणकर्त्यांना झुंड म्हणायचे’, अशी वागळे यांची साधी सरळ सोपी व्याख्या आहे.’

–        अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद