सनातनला ‘आतंकवादी’ ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

१० ऑगस्ट या दिवशी हिंदुत्वनिष्ठ श्री. वैभव राऊत यांना अटक केल्यानंतर हिंदुद्वेषाने पछाडलेल्या प्रसारमाध्यमांना आयतेच कोलित मिळाले. श्री. राऊत हे ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’शी निगडित असल्याचे, तर श्री. सुधन्वा गोंधळेकर हे ‘शिवप्रतिष्ठान’चे सदस्य असल्याचे पुढे येऊनही त्यांचा सनातनशी संबंध जोडून सनातनला लक्ष्य करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न प्रसारमाध्यमे करतांना दिसली. त्याची उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.

१. हिंदुत्वनिष्ठांना आधारस्तंभ असणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ‘बॉम्ब बनवणारे
तज्ञ’ असे संबोधून अवमानित करणारे ‘रिपब्लिकन’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी !

१ अ. इंग्रजी वृत्तवाहिनी ‘रिपब्लिक’ने रात्री १०.३० वाजता या विषयावर ‘बीजेपी व्हर्सेस सनातन’ (भाजप विरुद्ध सनातन) या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्राच्या आरंभीच या वाहिनीचे संपादक आणि सूत्रसंचालक अर्णव गोस्वामी यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ‘तुम्ही बॉम्ब का बनवत होता ?’ असा प्रश्‍न विचारला. त्यांनी ‘संजीव पुनाळेकर हे बॉम्ब बनवण्यात तज्ञ आहेत’, असेही वक्तव्य केले. (देव, देश आणि धर्म यांवर होणारे आघात परतवून लावण्यासाठी अहोरात्र झटणारे अधिवक्ता पुनाळेकर यांना ‘बॉम्ब बनवणारे तज्ञ’ म्हणून हीन पातळी गाठणारे अर्णव गोस्वामी ! चर्चासत्राचे किमान नियमही न पाळणारे असे संपादक समाजाचे प्रबोधन काय करणार ? – संपादक)

१ आ. अधिवक्ता पुनाळेकर यांचा सडेतोड प्रतिवाद !

अधिवक्ता पुनाळेकर याविषयी सविस्तरपणे सूत्र मांडू पहात असतांनाही गोस्वामी त्यांना मधेमधे अडवून अडथळा निर्माण करत होते. अधिवक्ता पुनाळेकर यांनीही स्वतःचे म्हणणे लावून धरले. अधिवक्ता पुनाळेकर यांनी गोस्वामी यांचा सनातनद्वेषी आर्विभाव पाहून ‘तुम्ही पत्रकारितेतील आतंकवादी आहात’, असे परखडपणे सांगितले.

२. सनातन संस्था आतंकवादी कृत्ये करत असल्याचे चित्र रंगवणारी ‘एबीपी’ हिंदी वृत्तवाहिनी !

‘एबीपी’ या वृत्तवाहिनीवर रात्री ११ वाजता ‘सनसनी’ या गुन्हेविषयक कार्यक्रम प्रसारित होतो. १० ऑगस्टच्या रात्री या कार्यक्रमात ‘सनातन संस्था का विस्फोटक प्लान’ या मथळ्याखाली नालासोपारा प्रकरणाचे वृत्त प्रसारित करून सनातनची अपकीर्ती करण्यात आली. यात अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना ‘बॉम्बवाले सैतान’ असे संबोधण्यात येत होते. (हिंदुत्वनिष्ठांवरील आरोप सिद्ध झाले नसतांना त्यांची अपकीर्ती करणारी ‘एबीपी’ बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे धर्मांध पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे बॉम्ब बनवत असल्याची अनेक प्रकरणे उजेडात आली असतांना त्याविषयी मात्र बोलत नाही ! – संपादक)

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपकीर्त करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शरीरावर झालेल्या पालटांची छायाचित्रे दाखवण्यात आली. ‘प.पू. आठवलेंच्या चमत्कारांच्या कथा पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत’, असे त्या वेळी सांगण्यात येत होते. (अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य जाणून न घेता त्यांची अपकीर्ती करण्याचा हा प्रयत्न म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार ! – संपादक) तसेच ‘या संस्थेवर लोकांना संमोहित करण्याचा आरोप लावण्यात येत आहे’, असेही सांगण्यात येत होते. (व्यक्तीच्या अनुमतीविना कोणालाही संमोहित करता येत नाही, असे विज्ञानच सांगत असतांना निवळ सनातनद्वेषाचा कंड शमवण्यासाठी अशा प्रकारची गरळओक करणारी एबीपी ! – संपादक)

२ आ. सनातन संस्था आतंकवादी संस्था असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न !

‘ज्या संस्थेवर पाखंड आणि अंधविश्‍वास यांचा प्रसार करण्याचा आरोप आहे’, ‘ज्या संस्थेकडून आत्मरक्षणाच्या नावाखाली शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते’, ‘ज्या सनातन संस्थेवर डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा आरोप आहे’ ती संस्था आज पुन्हा चर्चेत आहे, असे सांगून ‘सनातन संस्था आतंकवादी संस्था आहे’, असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. (निवळ आरोपावरून सनातनची अपकीर्ती करणारी ‘एबीपी’ सनातनद्वेष्टीच होय ! – संपादक)

३. श्री. वैभव राऊत हे सनातन संस्थेचे साधक असल्याचे सांगून संस्थेला लक्ष्य करणारे तरुण भारत आणि लोकमत !

३ अ. बेळगाव येथून प्रकाशित होणारे ‘तरुण भारत’ या वृत्तपत्राच्या मथळ्यात ‘सनातनच्या साधकासह तिघांना अटक’ असे नमूद करण्यात आले आहे, तसेच दैनिक ‘लोकमत’ या वृत्तपत्रानेही ‘सनातनच्या साधकासह ३ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक’, असे मथळ्यात लिहिले आहे.

(श्री. राऊत हे हिंदुत्वनिष्ठ असून ते संस्थेचे साधक नाहीत, याविषयी भूमिका स्पष्ट करूनही असे लिहिणे, हा सनातनची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न ! – संपादक)

४. हिंदूंना आतंकवादी म्हणून रंगवण्याचा प्रयत्न !

‘लोकसत्ता’ वृत्तपत्राने ‘हिंदु अतिरेक्यांना अटक’ असा मथळा केला आहे. (‘हिंदु आतंकवाद’, असा कोणता प्रकार अस्तित्वात नसतांना, आतापर्यंत हिंदुत्वनिष्ठांवर जे आरोप झाले, ते फोल असल्याचे सिद्ध झाले असतांना ‘हिंदु आतंकवाद’ असल्याची ओरड करून हिंदूंची अपकीर्ती करणारी वृत्तपत्रे ! – संपादक)

सनातनला आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र वारंवार उघड
झाले असतांना त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणारी प्रसारमाध्यमे !

१. मडगाव स्फोटाच्या प्रकरणात विशेष न्यायालयाच्या न्यायाधिशांनी ‘पोलिसांनी नोंद केलेला प्रथमदर्शी अहवाल हा केवळ सनातन संस्थेला गोवण्याच्या हेतूने बनवला होता, हे दिसून येते’, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

२. ठाणे स्फोटाच्या प्रकरणात निर्णय देतांना ‘पोलिसांनी ठाणे स्फोटाचा केलेला तपासच संशयास्पद होता’, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते.

या दोन्ही प्रकरणांतील न्यायालयाचे आदेश उपलब्ध आहेत. ते वाचण्याची तसदी प्रसारमाध्यमे का घेत नाहीत ? ‘सनातनची अपकीर्तीच करण्याची एकही संधी सोडायची नाही’, हे प्रसारमाध्यमांनी निश्‍चित केल्यामुळेच प्रसारमाध्यमांना वारंवार सनातनद्वेषाची उबळ येते, हेच नालासोपारा प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात