नालासोपारा प्रकरणाशी पू. संभाजी भिडेगुरुजी आणि पंतप्रधान मोदी यांचा संबध जोडण्याचा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा प्रयत्न

मोगलांच्या घोड्यांनाही जसे पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, तसे सध्या काँग्रेसवाल्यांना सर्वत्रच मोदी आणि पू. भिडेगुरुजी दिसत आहेत, त्याचेच हे उदाहरण होय !

भारतातून पसार झालेले डॉ. झाकीर यांना आलिंगन देणारे दिग्विजय सिंह यांनाही आता जिहादी आतंकवादी म्हणायचे का ? त्यांच्या पक्षालाही ‘आतंकवाद्यांचा पक्ष’ म्हणायचे का ?

नवी देहली – नालासोपारा प्रकरणात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. यात श्री. सुधन्वा गोंधळेकर यांचा समावेश आहे आणि ते ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’शी संबंधित आहेत. यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘या प्रकरणातील एक आरोपी सातारा येथील सुधन्वा गोंधळेकर हे ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे सदस्य आहेत. याचे प्रमुख संभाजी भिडे आहेत. संभाजी भिडे हे पंतप्रधान मोदी यांना गुरु समान मानतात. तुम्ही त्यांच्याविषयीचे मोदी यांचे विचार ‘यू ट्यूब’वर पाहू शकता.’ (दिग्विजय सिंह यांनी कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याला ‘ओसामाजी’ म्हटले होते. हे अनेक वर्तमानपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. देहलीच्या बाटला हाऊस येथील चकमकीत पोलिसांनी ठार केलेल्या आतंकवाद्यांना दिग्विजय सिंह यांनी निरपराध ठरवून त्यांच्या आझमगड येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनही केले होते. अशी व्यक्ती जेव्हा वरील प्रकारचे ट्वीट करते, तेव्हा तिचा हिंदुद्वेष स्पष्ट होतो ! – संपादक)

सिंह यांनी पुढे म्हटले आहे की, या बातमीविषयी केवळ १-२ वृत्तवाहिन्या सोडल्यास अन्य सर्व वृत्तवाहिन्या गप्प का आहेत? चर्चासत्रे का घेतली जात नाहीत ? (प्रत्यक्षात वृत्तवाहिन्या सनातनची अपकीर्ती करत आहेत आणि त्याविषयी चर्चासत्रेही घेतली आहेत आणि घेत आहेत; मात्र हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या दिग्विजय सिंह यांना ते कसे दिसणार ? – संपादक) भाजप आणि मोदीभक्त त्यांना राष्ट्रद्रोही का म्हणत नाहीत ? कारण हेच लोक मोदी यांच्या ‘ट्रोल आर्मी’चे (‘ट्रोल’ म्हणजे समाजमाध्यमावर एखाद्याने व्यक्त केलेले विचार न पटल्यास त्याला समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात विरोध करणे.) सदस्य आहेत. त्यांचे सैन्य आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात