थायलंडच्या ‘अयोध्ये’मध्ये (बँकॉकमध्ये) भव्य राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ

विदेशात राममंदिर उभारण्याची प्रक्रिया चालू होते; मात्र हिंदूबहुल भारतातील श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या ठिकाणी अजूनही राममंदिर उभारले जात नाही, हे भाजपच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

अयुध्या (थायलंड) – भारतातील अयोध्येत राममंदिराचे निर्माण अद्याप होऊ शकलेले नाही; मात्र थायलंडमधील अयोध्येत म्हणजेच ‘अयुध्या’ (१५ व्या शतकापर्यंत हे नाव होते. आता याला ‘बँकॉक’ असे म्हटले जाते.) येथे राममंदिराची उभारणी चालू झाली आहे. येथे भव्य राममंदिर उभारण्यात येत आहे.

थायलंडची राजधानी बँकॉक येथील रामजन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जन्मेजय शरण यांनी सांगितलले की, अयोध्येतील राममंदिराचे सूत्र न्यायालयात असले, तरी आम्ही येथे राममंदिराची उभारणी चालू केली आहे. येथे भूमीपूजन आणि सर्व धार्मिक विधी करून मंदिराची उभारणी चालू झाली आहे. येथील राममंदिराचे निर्माण भारताला विश्‍वगुरूच्या रूपात स्थापन करणार आहे. यामुळे भगवान श्रीरामांच्या आदर्शांचा प्रचार आणि प्रसार भारताच्या बाहेरही होणार आहे. येथील चाव फ्राय (सोराय) नदीच्या किनारी हे मंदिर उभारण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात