हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट 2’ !

काल रात्री मुंबईतील नालासोपारा येथून श्री. वैभव राऊत यांना अटक झाल्याच्या बातम्या येत आहेत. ते सनातन संस्थेचे साधक असल्याचेही बातम्यांमध्ये उल्लेख येत आहेत. श्री. वैभव राऊत हे एक धडाडीचे गोरक्षक असून ते हिंदु गोवंश रक्षा समिती या गोरक्षण करणार्‍या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते. ते हिंदु जनजागृती समितीच्या सर्व हिंदु संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्‍या हिंदूसंघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत असत; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता.

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांची अटक यांसारख्या प्रकरणांतून हे सिद्ध झाले आहे. आज येत असलेली वृत्ते पहाता श्री. वैभव राऊत यांची अटक ही मालेगाव पार्ट 2 आहे कि काय, अशी शंका येत आहे.

आपला नम्र,
श्री. सुनील घनवट,
  राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र.