कर्नाटक राज्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

मंगळूरू येथे झालेल्या गुरुपौर्णिमेला उपस्थित जिज्ञासू आणि सनातनचे संत १. पू. राधा प्रभु आणि २. पू. रमानंद गौडा

बेंगळूरू – सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि इतर समविचारी संघटनांनी मिळून कर्नाटकात बेंगळुरू, द. कन्नड, उ. कन्नड, बेळगाव, विजयपूर, शिवमोग्गा आदी जिल्ह्यांमध्ये एकूण २६ (कन्नड भाषेत २४, तर मराठीमध्ये २) ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी या महोत्सवांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

 

विविध ठिकाणी झालेली मान्यवरांची मार्गदर्शने

हिंदु धर्मावरील आक्रमणाविरुद्ध आपण संघटित
होऊ या !– अधिवक्ता उमाशंकर मेगुंदी, उच्च न्यायालय, बेंगळूरू

आज हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे होत आहेत. हे निधर्मी प्रजासत्ताकदेखील हिंदूंवरील आघात थांबवण्यात विफल झाले आहे. हिंदूंची धार्मिक स्थळे सरकारने कह्यात घेणे, हिंदु संतांवर खोटे आरोप करणे, साम्यवादी विचारसरणीच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रकरणातच विशेष अन्वेषण पथक नेमणे, अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या सर्व समस्या हिंदु समाजासाठी त्रासदायक आहेत. या सर्व समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !

हिंदूंच्या कायदेशीर साहाय्यासाठी सदैव सिद्ध असलेली हिंदु विधीज्ञ परिषद ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

‘संकटकर गणपती’या नावाचा एक चित्रपट काढण्यात आला आहे. त्यात हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या देवतांचे विडंबन करण्यात आले आहे. असे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंमधे संघटितपणा असणे आवश्यक आहे. हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीर साहाय्य करण्यास हिंदु विधीज्ञ परिषद सदैव  सिद्ध आहे.

केवळ धर्माच्या आधारानेच सामाजिक समस्यांचे
निर्मूलन शक्य आहे ! – अधिवक्ता बसवराज हळ्ळूर, बादामी

जगाला धर्माचा बोध करणारा देश केवळ भारतच आहे ! येथे विविधतेत आपण एकता पाहू शकतो. हे दुसर्‍या कोणत्याच देशात दिसत नाही. समाजातील चांगल्या व्यक्तींच्या मागे गुरुदेव आहेत. पुढे ध्येय मागे गुरु ! या उक्तीप्रमाणे प्रत्येक यशाच्या मागे गुरूच आहेत. कायद्याने समाजातील समस्यांचे निर्मूलन करणे शक्य नाही; परंतु धर्माच्या आधाराने ते शक्य आहे.

शिष्याच्या सर्वोच्च उन्नतीसाठी गुरूंची आवश्यकता ! – उमेश शर्मा गुरुजी, बेंगळूरू

भारताचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! या पुण्यभूमीत जन्म घेणे, हे आपल्या अनेक जन्मांचे पुण्यफल आहे. प्रत्येक क्षेत्रात गुरूंचे महत्त्व आहे. त्याच प्रमाणे सर्वोच्च उन्नतीसाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

प्राणीमित्र संघटना गोहत्या थांबवण्यासाठी पुढे येत नाहीत ! – अधिवक्ता दत्तात्रेय नायक, कुमटा

सर्वोच्च न्यायालयाने गोहत्येला बंदी घातली असूनही समाजात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गोहत्या थांबवण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नाही. एवढेच नव्हे, तर समाजाला त्रासदायक ठरलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायला गेल्यास प्राणीमित्र संघटना रोखण्याचा प्रयत्न करतात. तेच गोहत्येविषयी मात्र ‘तो मुसलमानांचा नैतिक हक्क’ असे म्हणतात.

युवा पिढीला सिद्ध करण्याचे दायित्व मातांचे आहे !- अधिवक्ता अभिमन्यू कुमार, मैसुरू

गुरु-शिष्य परंपरा ही अत्यंत पवित्र आहे. आजच्या या शुभदिनी आपण सर्वजण राष्ट्रोत्थानासाठी संकल्प करूया ! माता जिजाऊंनी सिद्धता करून घेतल्यामुळेच छत्रपती शिवाची महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करता आली. आजच्या युवा पिढीच्या सर्व समस्यांचा उपाय आजच्या मातांच्या हातीच आहे.

शिष्याच्या सर्वोच्च उन्नतीसाठी गुरूंची आवश्यकता ! – उमेश शर्मा गुरुजी, बेंगळूरू

भारताचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! या पुण्यभूमीत जन्म घेणे, हे आपल्या अनेक जन्मांचे पुण्यफल आहे. प्रत्येक क्षेत्रात गुरूंचे महत्त्व आहे. त्याच प्रमाणे सर्वोच्च उन्नतीसाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

प्राणीमित्र संघटना गोहत्या थांबवण्यासाठी पुढे येत नाहीत ! – अधिवक्ता दत्तात्रेय नायक, कुमटा

सर्वोच्च न्यायालयाने गोहत्येला बंदी घातली असूनही समाजात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गोहत्या थांबवण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नाही. एवढेच नव्हे, तर समाजाला त्रासदायक ठरलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायला गेल्यास प्राणीमित्र संघटना रोखण्याचा प्रयत्न करतात. तेच गोहत्येविषयी मात्र तो मुसलमानांचा नैतिक हक्क असे म्हणतात.

युवा पिढीला सिद्ध करण्याचे दायित्व मातांचे आहे !- अधिवक्ता अभिमन्यू कुमार, मैसुरू

गुरु-शिष्य परंपरा ही अत्यंत पवित्र आहे. आजच्या या शुभदिनी आपण सर्वजण राष्ट्रोत्थानासाठी संकल्प करूया ! माता जिजाऊंनी सिद्धता करून घेतल्यामुळेच छत्रपती शिवाची महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करता आली. आजच्या युवा पिढीच्या सर्व समस्यांचा उपाय आजच्या मातांच्या हातीच आहे.

गुरूंच्या आज्ञेचे पालन करत कार्य केल्यास हिंदू राष्ट्र स्थापना साध्य !
– डॉ. बालसुब्रह्मण्य भट, स्वच्छ टीम पुत्तुरूचे नियोजक, वळलंजे, सूळ्या.

आपल्या देशात ८० टक्के हिंदु असूनही हिंदु राष्ट्रासाठी आपल्याला लढा द्यावा लागतो, हे लज्जास्पद आहे. आध्यात्मिक, धार्मिक ग्रंथ वाचायला वेळ नाही; परंतु भ्रमणभाष हातातून सोडवत नाही. त्यामुळे आपल्या धर्माची स्थिती रसातळाला जात आहे. गुरुदेवांच्या आज्ञेचे पालन करून कार्य केले तरच हिंदु राष्ट्र स्थापना करता येईल.

प्रचलित शिक्षण पद्धतीची मोठी देणगी म्हणजे आजची
भ्रष्ट व्यवस्था ! – अधिवक्ता श्री. नीलकंठ वालीकार, विजयपूर

परंपरेने समस्त विश्‍वाला आदर्श दिला आहे. समाजातून प्रामाणिकपणा लोप पावला आहे. अधिकारामुळे व्यक्ती स्वार्थी होत आहे. गुरुकुल शिक्षण पद्धतीने आपण धैर्यशाली, भगीरथ होऊ शकतो. हिंदु धर्म सोडल्यास समस्त विश्‍वात इतर सर्व पंथच आहेत. आपले दुर्भाग्य म्हणजे ढोंगीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आजच्या राजकारण्यांचे मार्गदर्शक झाले आहेत.

राष्ट्रपुरुषांचे आणि संतांचे आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करून
भारताला पुन्हा विश्‍वगुरु करूया ! – श्री. नागराज, शिक्षक, न्यामती

समर्थ रामदास स्वामींसारखे गुरू भारतातील
अंधःकार दूर करण्यास हवेत ! – अधिवक्ता प्रसन्न कल्लिनकोटे

आजची पिढी मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे अधोगतीला जात आहे. युवक भारताच्या सत्य इतिहासापासून दूर जात आहेत; म्हणून समर्थ रामदासस्वामींसारखे गुरू भारतातील अंधःकार दूर करण्यासाठी हवे आहेत. त्यांचा आदर्श ठेवून आजच्या युवा पिढीला धर्मशिक्षण देऊया !

लक्षवेधी सूत्रे

१. कुमटा येथे सनातनचे संत पू. विनायक कर्वे आणि मंगळूरू येथे पू. राधा प्रभु अन् पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्थिती होती.

२. कुमटा येथे आमदार श्री. दिनकर शेट्टी आणि मंगळूरू येथे आमदार श्री. वेदव्यास कामत हे उपस्थित होते.

३. विजयपूर येथील कार्यक्रमाला अनुमाने ६० कि.मी. अंतरावरून १६ धर्मप्रेमी आले होते. त्यांनी त्यांच्या गावात मोठी धर्मजागृती सभा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

४. उजिरे येथील महोत्सवानंतरच्या संवादामध्ये बोलतांना ३० जिज्ञासूंनी १ घंटा धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. तसेच २ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग प्रारंभ करण्याची मागणी करण्यात आली. ४ धर्मप्रेमी प्रसारसेवेत सहभागी होणार आहेत.

५. वळलंबे-सूळ्या येथील एका धर्मप्रेमीला ‘भारतीय संस्कृती नष्ट होत आहे’, असे वाटत होते; परंतु या कार्यक्रमानंतर त्याला स्फूर्ती मिळून भारतीय संस्कृतीच्या रक्षणाविषयी आशा निर्माण झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात