श्रीमती पार्वती ननावरेआजी (वय ७४ वर्षे) आणि श्रीमती माया गोखलेआजी (वय ७४ वर्षे) बनल्या सनातनच्या अनुक्रमे ८० व्या आणि ८१ व्या संत !

गुरुपौर्णिमेनंतर पुणे जिल्ह्यातील साधकांनी अनुभवली आध्यात्मिक दिवाळी !

गुरुमाऊलींच्या कृपेने २ साधकपुष्पे संतपदी विराजमान, ६ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीमती पार्वती ननावरे
श्रीमती माया गोखलेआजी

पुणे – पुणे आणि चिंचवड येथे १ ऑगस्टला दोन भावसोहळे झाले अन् दोन्ही ठिकाणी साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने सर्व साधक भावभक्तीच्या विश्‍वात हरवून गेले. पुणे येथील श्रीमती पार्वती ननावरेआजी (वय ७४ वर्षे) आणि चिंचवड येथील श्रीमती माया गोखलेआजी (वय ७४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या अनुक्रमे ८० व्या आणि८१ व्या संतपदी विराजमान झाल्या.

गावठाण येथील श्री. शांताराम जाधव (वय ६४ वर्षे), तळेगाव येथील श्री. नृसिंह लेले (वय ६७ वर्षे), सांगवी येथील श्रीमती रुक्मिणी पाटील (वय ६० वर्षे), पिंपरीगाव येथील सौ. अलका पवार (वय ५४ वर्षे), चिंचवड येथील सौ. भूमिका जमदाडे (वय ४३ वर्षे) आणि सौ. स्नेहा ओजाळे (वय ४८ वर्षे) हे ६ साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून गुरुचरणी लीन झाले. सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते अध्यात्मात गरुडझेप घेतलेल्या या सर्व साधकांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी झालेल्या भावसोहळ्यामध्ये उपस्थित साधकांनी या प्रसंगी गुरुकृपेच्या वर्षावाची प्रचीती घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात