राजापूर येथील श्री. चंद्रसेन मयेकर (वय ८० वर्षे) सनातनच्या ७८ व्या आणि चिपळूण येथील श्री. श्रीकृष्ण आगवेकर (वय ८१ वर्षे) सनातनच्या ७९ व्या संतपदी विराजमान !

साधकांना आनंदाची पर्वणी !

श्री. चंद्रसेन मयेकर
श्री. श्रीकृष्ण आगवेकर

रत्नागिरी – राजापूर येथील श्री. चंद्रसेन मयेकर (वय ८० वर्षे) सनातनच्या ७८ व्या आणि चिपळूण येथील श्री. श्रीकृष्ण आगवेकर (वय ८१ वर्षे) सनातनच्या ७९ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी भावसोहळ्यात दिली. या वेळी सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम उपस्थित होते. याचसमवेत देवरुख येथील साधकदांपत्य श्री. विनायक फाटक आणि सौ. गीतांजली फाटक, रत्नागिरी येथे रहाणार्‍या सौ. माधवी पाटील आणि सुसेरी (खेड) येथील श्री. विजय भुवड या चार साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात