सर्वांगांनी परिपूर्ण आणि एकमेवाद्वितीय असलेल्या सनातनच्या ९ व्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची साधनेतील वाटचाल

१. सद्गुरु (सौ.) बिंदाताई वर्ष २०१३ मध्ये संतपदी विराजमान झाल्या, तेव्हा हर्षोल्लसित झालेले साधक, २. एस्एस्आर्एफ्च्या संत पू. (सौ.) योया वाले
हिंदु राष्ट्रासाठी सक्षम पिढी घडवणे, हे सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचे प्रमुख कार्य ! हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली नेर (यवतमाळ) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अनुष्का सोनटक्के हिचा सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात परिचय करून देतांना सद्गुरु (सौ.) बिंदाताई, डावीकडे सद्गुरु (कु.) अनुताई

‘फोंडा (गोवा) येथील असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वर्ष १९९६ मध्ये सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केला. प्रारंभी त्या गोवा राज्यात अध्यात्मप्रसार करायच्या. त्यानंतर त्यांना लेखाच्या सेवेची संधी मिळाली. त्याच वेळी त्यांनी आश्रमाशी संबंधित सेवा करण्यासही आरंभ केला. आरंभी अबोल असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आश्रमातील सेवा करतांना प्रीतीवर्षाव करून समष्टीला आपलेसे केले. तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही भावपूर्ण-परिपूर्ण गुरुसेवेच्या ध्यासाने त्यांच्यावर सेवेतूनच उपाय झाले. अन्य विभागांतील सेवा करतांनाच आश्रमातील अन्य सेवांमध्ये येणार्‍या अडचणी सोडवणे, अन्य आश्रमांतील सेवा परिपूर्ण होण्यासाठी साहाय्य करणे, भारतभरातील साधकांच्या समस्या सोडवणे, साधकांच्या साधनेला गती देणे अशी त्यांच्या सेवेची व्याप्ती वाढतच आहे. प्रचंड कार्यक्षमतेने सेवा करतांनाच त्यांची वेगाने झालेली आध्यात्मिक प्रगती सर्व साधकांसाठी आदर्श आहे. वर्ष २०१० मध्ये त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, तर वर्ष २०१३ मध्ये ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केले. नंतर ३ वर्षांतच म्हणजे वर्ष २०१६ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी ८१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या. १८-१९ घंटे उत्साहाने सेवा करणे, अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन उपाययोजना काढणे, प्रसारकार्यासाठी अल्प कालावधीत आदर्श साधक घडवणे आणि साधनेसाठी घरादाराचा त्याग केलेल्या साधकांना वात्सल्याने आपलेसे करून त्यांच्या साधनेतील अडचणी दूर करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे !

 

सद्गुरु (सौ.) बिंदाताईंना असणारी साधकांच्या प्रगतीची तळमळ

 • साधकांच्या साधनेत अनेक चढ-उतार होतात. उत्तरदायी साधकांनी मार्गदर्शन करूनही काही साधकांचे प्रयत्न अल्प पडत असल्याने काही वेळा त्यांची साधनेत घसरण होते. अशा वेळी ‘साधक मागे पडले, तर आपणच त्यांना साहाय्य करायला अल्प पडलो’, असे सद्गुरु ताईंना वाटते.
 • अनेकदा ‘साधकांची प्रगती व्हायला हवी’, असे सांगतांना त्यांच्या डोळ्यांत पाणी येते. साधकांची अध्यात्मात प्रगती करण्याची तळमळ आणि प्रयत्न अल्प पडतात; मात्र सद्गुरु ताईंच्या साधकांप्रतीच्या वात्सल्यभावामुळे त्या स्वतःहून साधकांची प्रगती होण्यासाठी साहाय्य करतात.’

 

हिंदु राष्ट्रातील राज्यकर्ते सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासारखे असतील !

 • ‘ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या तिन्ही योगांचा अन् व्यष्टी साधना अन् समष्टी साधना यांचा अपूर्व संगम सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात आहे.
 • आध्यात्मिक प्रगती शक्ती, भाव, चैतन्य, आनंद, शांती अशा स्तरांवर होत जाते. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या सर्व स्तरांवर एकाच वेळी आणि नेहमीच असतात.
 • हिंदु राष्ट्रातील राज्यकर्ते सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रमाणे असतील. सर्वांना तात्काळ न्याय आणि नेहमीच साधना केल्याच्या आनंदाची अनुभूती येईल.

हिंदु राष्ट्रात त्यांच्यासारखे अनेक परिपूर्ण मार्गदर्शक लागतील, हे लक्षात घेऊन त्या इतरांनाही वेगाने तयार करत आहेत. ‘प्रीती’ हा त्यांचा स्थायीभाव असल्याने ‘घरादाराचा त्याग केलेल्या साधकांना माझ्यानंतर कोण सांभाळून घेणार ?’, ‘त्यांची प्रगती कोण करून घेणार ?’ या चिंतेतून त्यांनी मला मुक्त केले आहे. वात्सल्यभावाने ओतप्रोत असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा यांनी साधकांवर आईच्या मायेने केलेले प्रेम आणि साधनेतील प्रगतीसाठी केलेले साहाय्य यांची महती शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील काही दैवी गुण !

 • सेवेचे बारकाव्यांसह परिपूर्ण नियोजन करून १०० टक्के फलनिष्पत्तीने कृती करणे
 • सूत्र वरवर न हाताळता सखोल अभ्यास करून दूरगामी उपाययोजना काढणे
 • अनेक व्याप सांभाळूनही प्रत्येक ठिकाणी असलेली गतीमान निर्णयप्रक्रिया
 • केवळ नियोजन करून अथवा उपाययोजना काढून न थांबता त्याच्या कार्यवाहीत
 • काही अडचणी येत नाहीत ना, याचा स्वतःहून आढावा घेणे
 • समस्या पूर्ण सुटेपर्यंत पुनरावलोकन करणे
 • साधकांचे उत्कृष्ट निरीक्षण करून त्यांच्या गुणांचे कौतुक करणे, प्रेमाने सांभाळून  घेणे आणि आध्यात्मिक स्तरावर पुढे पुढे घेऊन जाणे

 

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील अनोखे गुण

 • सेवेचा अनुभव, ज्ञान असूनही अन् सद्गुरुपदावर आरूढ असल्यामुळे सूक्ष्मातील जाणत असूनही साधकांशी चर्चा करून, त्यांना विश्‍वासात घेऊनच निर्णय घेणे.
 • साधकांना अभ्यास करण्यासाठी उद्युक्त करून निर्णय घेण्यासाठी स्वावलंबी करणे