तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील पू. (श्रीमती) पुतळाबाई (माई) देशमुख ७६ व्या संतपदी विराजमान !

सोलापूर – तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील पू. (श्रीमती) पुतळाबाई (माई) देशमुख (वय ७० वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ७६ व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत, असे आनंददायी वृत्त येथे झालेल्या भावसोहळ्यात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सर्वांना दिले. गुरुपौर्णिमेच्या आधीच श्रीकृष्णाने आनंदाचा वर्षाव केल्याने सर्वांची भावजागृती झाली. या वेळी सद्गुरु(कु.) स्वाती खाडये यांनी त्यांचा सन्मान केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात