सोलापूर येथे सनातन संस्थेच्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त हितचिंतक, विज्ञापनदाते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सोलापूर – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने नुकतेच या दिवशी मीठ गल्ली येथील श्री कामेश्‍वर मंगल कार्यालय येथे दैनिक सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, अर्पणदाते आणि विज्ञापनदाते यांच्यासाठी ‘साधनावृद्धी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना साधनेचे महत्त्व आणि ती कशी करावी ?, नामजपाच्या  परिणामकारक पद्धती आणि त्यांचे लाभ, प्रार्थनेचे महत्त्व, आध्यात्मिक उपाय कसे करावेत, स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं निर्मूलन याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला ६४ वाचक आणि हितचिंतक उपस्थित होते. मंगल कार्यालयाचे विश्‍वस्त श्री. श्रीशैल बनशेट्टी यांनी कार्यालय, वीज व्यवस्था, तसेच अन्य साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.

क्षणचित्र : साधनावृद्धी शिबिराचे अन्य भागांमध्ये आयोजन करण्यासाठी २ जणांनी पुढाकार घेतला.

वाचक आणि हितचिंतक यांचे अभिप्राय

१. येथे आल्यानंतर चांगले वाटले. प्रार्थनाही भावपूर्ण झाल्या.

२. पूर्वी साधना करत होतो; आता या शिबिरातून अधिक साधना करण्यासाठी ऊर्जा मिळाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात