मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !

प्राचीन काळात ज्याला ‘मलय द्वीप’ म्हणत होते, ते म्हणजे आताचा मलेशिया देश. ‘मलय द्वीप’ म्हणजे अनेक द्विपांचा समुच्चय आहे. पुढे या द्विपाला ‘मेलका’, असे म्हणत असत. मलय भाषेत अनेक संस्कृत शब्दांचा उपयोग केला जातो. मलय भाषेच्या साहित्यामध्ये ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचा संबंध दिसून येतो. १५ व्या शतकापर्यंत, म्हणजे मलेशियात ‘इस्लाम’ येईपर्यंत ‘मजापाहित’, ‘अयुद्धया’ आणि ‘श्रीविजय’ या हिंदु साम्राज्यांनी १ सहस्र ५०० वर्षे राज्य केले. २ सहस्र वर्षांपूर्वी मलेशियाच्या इतिहासाविषयी कुठेही विशेष उल्लेख आढळत नाही. 

४. मलेशियावर राज्य करणार्‍या प्राचीन राजांची नावे (टीप १)

श्री. पूगळेंदी सेंथियप्पन्

संस्कृत आणि तमिळ या भाषांच्या प्रभावामुळे सिंगापूर अन् मलेशिया मधील ‘मलय’ राजवटीत ‘राजा’ ही संकल्पना रुजलेली होती. मलेशियावर राज्य करायला आलेल्या प्रथम मलय राजापासून ते ७०० वर्षांपर्यंतच्या मलय राजांचा इतिहास डॉ. आगुस सलीम यांनी लिहिलेल्या ‘स्टोरी ऑफ सिंगापूर मलय रूलर्स’ या पुस्तकात आहे.

टीप १ – सिंगापूरवर राज्य करणार्‍या राजांची कारकीर्द डॉ. आगुस सलीम यांनी केलेल्या संशोधनातून घेतली आहे. (‘द किंग ऑफ १४ सेंचुरी सिंगापूर, जेएम्बीआर्एएस् २० (२))

टीप २ – ‘स्त्री त्रिभुवन’ याचा अर्थ आहे, ‘स्त्री = श्री, त्रि = तीन, भुवन = लोक.’

५. मलेशियाच्या राजाचे निवासस्थान

‘इस्ताना नेगरा’ हे यंग दी पेर्तुआन अगोंग यांचे (मलेशियाच्या राजाचे) अधिकृत निवासस्थान

‘इस्ताना नेगरा’ हे यंग दी पेर्तुआन अगोंग यांचे (मलेशियाच्या राजाचे) अधिकृत निवासस्थान आहे. ‘इस्ताना नेगरा’ हे मूळ संस्कृत भाषेतील आहे. संस्कृतमध्ये ‘नगर स्थानम्’ असे होते.

यंग दी पेर्तुआन अगोंग आणि त्याची पत्नी राजा परमैसुरी अगोंग यांचे सिंहासन (सिंह + आसन = सिंहासन)

भगवान विष्णूच्या नरसिंहावताराचा अंश सोनेरी आहे, तसेच सोनेरी रंग शाही आहे.

६. शाही प्रतिके

मलेशियाच्या शाही प्रतिकांपैकी एक असलेल्या अणकुचीदार गदेचे निरनिराळे प्रकार आणि त्यासमवेत अन्य शस्त्रे

राजा किंवा सुलतान यांच्यासाठी वापरण्यात येणारी छत्री. (त्यावरील नक्षी गोलात मोठी करून दाखवली आहे.)

६ अ. पिवळी छत्री

राजा किंवा सुलतान यांच्यासाठी पिवळ्या रंगाची छत्री

६ आ. गदा

‘गदा’ हा मूळ संस्कृत शब्द असून तमिळमध्ये त्याला ‘गदाइ’, मलयमध्ये ‘गेदक’, जुन्या टॅगलॉग भाषेत ‘बतुता’ असे म्हटले जाते. हे आयुध लाकूड किंवा धातू यांपासून बनवले जात असून ते दक्षिण आशियाचे आहे. गदा म्हणजे एका दांड्याला गोलाकारातील शिर असून त्यावर अणकुचीदार टोक असते. भारताबाहेरील दक्षिण-पूर्व आशियाने ‘गदा’ स्वीकारली आहे. ‘सिलट’ या ‘मार्शल आर्ट्स’च्या (स्वसंरक्षणाच्या) प्रकारामध्ये तिचा उपयोग केला जातो.

‘गदा’ हे हिंदु देवता हनुमंताचे प्रमुख आयुध आहे. शक्ती अन् सामर्थ्य यांसाठी ओळखल्या जाणार्‍या हनुमंताची पूजा दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामधील कुस्तीपटू करतात. चतुर्भुज भगवान विष्णूच्या एका हातात ‘कौमोदकी’ (कौमुदी) नावाची गदा आहे. महाभारतात भीम, दुर्योधन, जरासंध यांसारखे योद्धे ‘गदेचे स्वामी’ म्हणून ओळखले जातात.’

– श्री. पूगळेंदी सेंथियप्पन्, मलेशिया