आध्यात्मिक अनुभूतींच्या वेळी मेंदू चकाकतो ! – संशोधकांचा निष्कर्ष

  • अध्यात्माला आणि त्यातील येणार्‍या अनुभूतींना थोतांड म्हणणारे तथाकथित निधर्मीवादी अन् पुरोगामी यांना पाश्‍चात्त्य संशोधकांची चपराक !
  • असा अभ्यास भारतातील एकतरी नास्तिकतावादी, पुरो(अधो)गामी संघटना, संस्था किंवा व्यक्ती करतो का ?
  • मन आणि बुद्धी यांना जे समजते, तेच खरे समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी असा अभ्यास आणि साधना करतील का ?

न्यू हेवन (अमेरिका) – मनुष्य आध्यात्मिक अनुभूती घेत असतांना त्याच्या मेंदूतील एक भाग चकाकत असतो, असे संशोधकांना आढळून आले आहे. अशा अनुभूतींच्या वेळी मेंदूच्या ‘पेरिएटल कॉर्टेक्स’ या भागातील हालचाली वाढतात. हा भाग ‘स्व’विषयीची जागृती आणि एकाग्रता यांच्याशी संबंधित आहे, असेही यात आढळले आहे. ‘सेरेब्रल कॉर्टेक्स’ या नियतकालिकात याविषयीच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. येथील ‘येल चाईल्ड स्टडी सेंटर’मधील मार्क पोटेंझा यांनी याविषयीची माहिती दिली.

मार्क पोटेंझा पुढे म्हणाले, ‘‘आध्यात्मिक स्वरूपाचे अनुभव हे एखाद्या व्यक्तीवर तीव्र प्रभाव टाकणारे असतात. अशा अनुभवांचा चेतासंस्थेतील पाया शोधण्यासाठी हा प्रयत्न केला गेला. मानसिक आरोग्यासाठीही हे संशोधन अतिशय महत्त्वाचे ठरू शकते. ‘आध्यात्मिक’ अनुभव हे रूढार्थाने ‘धार्मिक’ अनुभव असतीलच असे नाही. निसर्गाशी तादात्म्य पावण्याचा अनुभव असाच आहे. स्वतःला विसरून विराटाशी तादात्म्य पावण्याचा हा अनुभव आहे. भारतीय संस्कृतीत उपनिषद म्हणजेच वेदांताने वर्णन केलेला अद्वैताचा अनुभव हाच आहे. चराचराला व्यापून राहिलेल्या एकमेवाद्वितीय ‘ब्रह्म’ नामक चैतन्याशी ज्या वेळी व्यक्ती तादात्म्य पावते, त्या वेळी त्याला समाधीचा अनुभव म्हटले जाते.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात