सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चतुर्थ दिवस द्वितीय सत्र

‘दक्षिण भारताच्या समस्यांची सद्यःस्थिती’ या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार !

डावीकडून जी. राधाकृष्णन्, अर्जुन संपथ, त्रिदंडी स्वामी श्री चैतन्यदास भारती महाराज, टी. एन्. मुरारि, डॉ. विजय जंगम

 

तमिळनाडूमध्ये तमिळी आणि हिंदु वेगळे करण्याचे षड्यंत्र ! – अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी, तमिळनाडू

अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमधील सद्यःस्थिती हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात आहे. सध्या तेथे ख्रिस्त्यांचा प्रभाव वाढत असून त्यांचा प्रभाव चर्चसह विविध गावे, राजकीय पक्ष आणि नेते अशा गोष्टींवरही दिसून येतो. त्यामुळे तमिळनाडूमध्ये आलेल्या राम रथयात्रेला तेथील काही पक्ष आणि त्यांचे नेते यांनी विरोध केला. असे असूनही रथयात्रा यशस्वी झाली. सध्या तमिळनाडू फॅसिस्ट राज्य झाले आहे. सध्या तमिळी आणि हिंदु वेगळे आहेत, असा चुकीचा समज पसरवण्याचे षड्यंत्र चालू आहे.

 

वीरशैव लिंगायतांना सनातन धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र सहन करणार नाही ! – डॉ. विजय जंगम, राष्ट्रीय प्रवक्ता, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, मुंबई

डॉ. विजय जंगम, राष्ट्रीय प्रवक्ता, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, मुंबई

सध्या हिंदु धर्माला तोडण्याचे षड्यंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असून त्यासाठी देशातील अनेक संघटनांना विदेशातून निधी पुरवला जात आहे. वीरशैव लिंगायत हा वेगळा धर्म नसून तो सनातन हिंदु धर्माचेच अविभाज्य अंग आहे. वीरशैव लिंगायत समाजाला हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे. कर्नाटकमधील निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करत मते मिळवण्यासाठी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता दिली. असे असले, तरी आम्ही लिंगायत समाजाला वेगळे करण्याचे षड्यंत्र सहन करणार नाही. त्याला तीव्र विरोध करू. वीरशैव लिंगायत हे हिंदु होते, आहेत आणि यापुढेही रहाणारच ! लिंगायतांना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. भाजपने वर्ष २०१९ च्या निवडणुकीसाठीच्या घोषणापत्रात विकासाऐवजी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचे वचन द्यावे, असे आवाहन डॉ. विजय जंगम यांनी केले. ते कर्नाटकातील लिंगायतांना हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र थांबवण्याची आवश्यकता या विषयावर बोलत होते.

 

हिंदु राष्ट्राची स्थापना कन्याकुमारीपासून होणार ! – जी. राधाकृष्णन् , राज्य अध्यक्ष, शिवसेना, चेन्नई, तामिळनाडू

जी. राधाकृष्णन् , राज्य अध्यक्ष, शिवसेना, चेन्नई, तामिळनाडू

हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनामुळे तमिळनाडूतील हिंदू संघटनांमध्ये कुटुंब भावना निर्माण होत आहे. सनातनच्या मार्गदर्शनामुळे माझे संपूर्ण कुटुंब साधना करायला लागले आहे. साधनेमुळे कार्याची गुणवत्ता सुधारते आणि हिंदू संघटित होतात, असे प्रतिपादन श्री. राधाकृष्णन् यांनी केले. ते राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठी तमिळनाडूमध्ये केलेले प्रयत्न या विषयावर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, तमिळनाडू आध्यात्मिक राज्य आहे. येथे अनेक संत आहेत. तमिळनाडूतील जनता भाजपला नव्हे, तर हिंदुत्वाला मतदान करते. हिंदवा सेवा संघ, विवेकानंद केंद्र यांच्या माध्यमातून येथे हिंदुत्वाचे कार्य केले जाते. त्यांच्याकडून एक महाविद्यालय चालू करण्यात आले आहे. असे असूनही किनारपट्टीवर ख्रिस्त्यांची अरेरावी चालते. कोईम्बतूर शहरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. राज्यकर्ते, लेखक, अभिनेता सर्व अहिंदू सक्रीय झाले आहेत. कपाळावर टिळा लावायलाही बंदी आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कन्याकुमारीमध्ये होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखले आहे.

 

धर्मकार्य करतांना येणारे अडथळे दूर करण्यासाठी साधना वाढवणे अत्यावश्यक ! – त्रिदंडी स्वामी श्री चैतन्यदास भारती महाराज, प्रबंधकीय न्यासी, भारत क्षेत्रभूमी संरक्षण वेदी, मल्लपुरम, केरळ

त्रिदंडी स्वामी श्री चैतन्यदास भारती महाराज, प्रबंधकीय न्यासी, भारत क्षेत्रभूमी संरक्षण वेदी, मल्लपुरम, केरळ

मल्लपुरम जिल्हा धर्मांधबहुल आहे. या परिसरात अत्यल्प मंदिरे आहेत. त्यामुळे या परिसरात मी देवीचे मंदिर बांधायचे ठरवले. मंदिर बांधायला धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. बांधलेले मंदिर तोडण्यापयर्र्ंत मुसलमानांची मजल गेली. हे मंदिर वाचवण्यासाठी माहिती अधिकाराचा उपयोग करून जिल्हाधिकार्‍यांना विचारणा केली. जिल्हाधिकार्‍यांकडून योग्य उत्तर आले नाही. या देवळात भजन लावण्यात येत होते, त्याचाही धर्मांधांना त्रास झाला. हे भजन बंद करण्यासाठी धर्मांधांनी एका प्रशासकीय अधिकार्‍यांचे साहाय्य घेऊन भजन थांबवण्याचा आदेश मिळवला. या आदेशाच्या विरोधात मी उच्च न्यायालयात गेलो. तेथे आमच्या बाजूने निकाल लागला. या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यांचे आम्हाला साहाय्य मिळाले नाही. असे अनेक प्रसंग आहेत. अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी आपण साधना वाढवली पाहिजे. त्यामुळे येणारे अडथळे दूर होतील. मी स्वत: लोकांना एकत्र करतो. त्यांना साधनेचे महत्त्व सांगतो. हिंदु राष्ट्राचे महत्त्व सांगतो, असे मनोगत त्रिदंडी स्वामी यांनी केरळमधील हिंदु धर्मविरोधी षड्यंत्र या विषयावर व्यक्त केले.

 

तेलंगण शासनाकडून अल्पसंख्यांना (मुसलमानांना) मोठ्या प्रमाणात साहाय्य ! – टी. एन्. मुरारि, राज्य प्रमुख, शिवसेना, भाग्यनगर (हैद्राबाद), तेलंगणा

टी. एन्. मुरारि, राज्य प्रमुख, शिवसेना, भाग्यनगर (हैद्राबाद), तेलंगणा

आंध्रप्रेदश येथील चंद्रबाबू नायडू यांचे शासन आणि तेलंगणा येथील शासन अल्पसंख्यांकांचे (मुसलमान) यांचे लांगूलचालन करतात. आंध्रप्रदेश शासनाने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली १०० हून अधिक मंदिरे मोडली; मात्र एकही मशीद आणि चर्च तोडले नाही. या संदर्भात आम्ही आंदोलन केल्यावर आम्हाला तोडलेल्या मंदिराच्या शेजारी मंदिर उभारून देऊ, असे आश्‍वासन देण्यात आले. ४ वर्षांनंतरही यातील एकही मंदिर बांधण्यात आलेले नाही. तेलंगण राज्यात मुसलमानांना रमझानसाठी मोठ्या प्रमाणात भेटवस्तू देण्यात येत आहेत, याउलट हिंदूंच्या सणांना काहीच दिले जात नसे. या संदर्भात शिवसेनेने आंदोलन केले. त्यामुळे किमान हिंदूंना काही प्रमाणात तरी सुविधा देणे भाग पडले, असे मनोगत टी. एन्. मुरारी यांनी व्यक्त केले. ते तेलंगणा शासनाची हिंदूविरोधी धोरणे या विषयावर बोलत होते.