सामाजिक संकेतस्थळाद्वारे अल्प वेळेत आणि अत्यल्प व्ययात हिंदु राष्ट्र-स्थापनेचा व्यापक प्रसार करता येतो ! – कु. कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था, नवी देहली.

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रसारमाध्यमांचे कार्य’ या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार !

सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या दुसर्‍या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रसारमाध्यमांचे कार्य’ या उद्बोधन सत्रात ‘प्रसारमाध्यमांचा वापर करून धर्मप्रसार कसा करावा ?’, ‘अन्य प्रसिद्धी माध्यमे हिंदूंना न्याय देत नसल्याने हिंदू वृत्तवाहिनीचे महत्त्व काय ?’, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत पत्रकारांचे योगदान कसे घेता येऊ शकते ?’, तसेच ‘सामाजिक संकेतस्थळांचा प्रभावी वापर करून व्यापक धर्मप्रसार कसा करता येतो ?’ यावर मान्यवरांनी मते व्यक्त केली.

सामाजिक संकेतस्थळाद्वारे अल्प वेळेत आणि अत्यल्प व्ययात हिंदु राष्ट्र-स्थापनेचा
व्यापक प्रसार करता येतो ! – कु. कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था, नवी देहली.

कु. कृतिका खत्री सामाजिक संकेतस्थळ या विषयावर अनुभवकथन करतांना म्हणाल्या, सामाजिक संकेतस्थळाद्वारे (सोशल मीडियाद्वारे) अल्प वेळेत आणि अत्यल्प व्ययात हिंदु राष्ट्र-स्थापनेचा व्यापक प्रसार करता येतो. धर्मप्रेमी हिंदूंना एकत्र करून व्यापक जनआंदोलन उभारता येते. विटंबना रोखण्यात समितीच्या संकेतस्थळावरून चालवलेल्या मोहिमांमुळे यश मिळत आहे. या माध्यमातून आजवर अशाप्रकारे २५० हून अधिक घटनांमध्ये देवतांचे होणारे विडंबन रोखले आहे.

शहरी लोकांना आमची संस्था धर्मशिक्षण देण्याचे
कार्य करते ! – आशिष धर, सहसंस्थापक, प्रज्ञता, नवी देहली.

वैचारिक हिंदूंपेक्षा जे हिंदू धर्मपालन करतात, असे सामान्य हिंदूही श्रेष्ठ आहेत. शहरी भागात अशा वैचारिक हिंदूंचे ख्रिस्तीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे वैचारिक पतन होणार्‍या आणि हिंदुत्वापासून लांब जाणार्‍या शहरी लोकांना धर्मशिक्षण देण्याचे कार्य आमची संस्था करते. साधनेमुळे आपल्याला वैचारिक सुस्पष्टता येते. त्यामुळे साधना अत्यावश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीकडून आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा मिळते. राष्ट्रीय अधिवेशनात आल्यावर विविध स्तरांवर कार्य करणार्‍यांना भेटल्यावर वैचारिक देवाण-घेवाण होऊ अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात, असे मार्गदर्शन नवी देहली येथील श्री. आशिष धर यांनी केले.

‘हिंदू टिव्ही’च्या माध्यमातून हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न !
– भरतकुमार शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंदू टिव्ही, भाग्यनगर, तेलंगण.

सगळीकडे पाहिल्यास मुद्रित होणारी प्रसिद्धीमाध्यमे, दूरचित्रवाहिन्या, सामाजिक संकेतस्थळांवरून चालवली जाणारी प्रसिद्धीमाध्यमे हिंदूंना न्याय देऊ शकत नाहीत. प.पू. आसारामजी बापू, स्वामी नित्यानंद यांच्या विरोधात प्रसिद्धीमाध्यमे दिवसभर कार्यक्रम दाखवतात; मात्र हिंदूंच्या बाजूचे वृत्त दाखवण्यासाठी त्यांच्याकडे पाच मिनिटेही नाहीत. हिंदूंच्या विरोधात वृत्त देणारी प्रसिद्धीमाध्यमे मदरशांमधून, तसेस मौलवींकडून होणारे अत्याचार कधी दाखवत नाहीत. त्यामुळे हिंदु धर्मियांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी हिंदू टिव्ही ही वाहिनी चालू केली. प्रारंभी आम्हाला अनेक अडचणी आल्या; मात्र राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रेमापोटी आम्ही आमचे कार्य निर्धाराने चालू ठेवले आहे, असे मार्गदर्शन भरतकुमार शर्मा यांन केले.

बंगालमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार कोणतेही प्रसिद्धीमाध्यम दाखवत नाही !
– उपानंद ब्रह्मचारी, हिंदू एक्झिस्टन्स, दक्षिण २४ परगणा, पश्‍चिम बंगाल.

पश्‍चिम बंगालमध्ये हिंदूंची स्थिती दयनीय आहे. जिहादी धर्मांध सातत्याने हिंदूंवर अत्याचार करतात; मात्र हिंदूंवर होणारे अत्याचारांना कधीही प्रसिद्धीमाध्यमातून वाचा फोडली जात नाही. निधर्मी प्रसिद्धी माध्यमात रोहिंग्यांना तुम्ही ‘आतंकवादी’ म्हणू शकत नाहीत, इतकी वाईट स्थिती आहे. ख्रिस्ती आणि इस्लामिक संघटनांकडून बंगालमधील प्रसारमाध्यमांना आर्थिक साहाय्य मिळते त्यामुळे ते कधीच खरे वृत्त प्रसारित करत नाहीत. बंगालमध्ये जे हिंदुत्वाचे कार्य करण्याचे प्रयत्न करतात त्यांना तत्काळ दाबण्याचे कार्य होते. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांनी त्यांच्या दैनिकांतून जसे हिंदूंना जागृत केले, तसेच दैनिक सनातन प्रभात जसे हिंदूंची बाजू मांडते तशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमांची आज अत्यावश्यकता आहे, असे मार्गदर्शन श्री. उपानंद ब्रह्मचारी यांनी केले.

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीकोनातून पत्रकारांना कृतीशील करण्याचा
समितीचा प्रयत्न ! – श्री. अरविंद पानसरे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी पत्रकारांना कृतीशील बनवण्यासाठी संपादक-पत्रकार अधिवेशन, हिंदु राष्ट्र-संपर्क अभियान असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांच्या वेळी हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य अभ्यासपूर्ण मांडल्याने लव्ह जिहादसारख्या संवेदनशील विषयावरही पत्रकारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. काही पत्रकारांनी हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयावर मुलाखती घेऊन त्याला प्रसिद्धी दिली. या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यास साहाय्य झाले, तसेच हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीकोनातून पत्रकारांना कृतीशील करण्याचा समितीचा प्रयत्न आहे, असे श्री. अरविंद पानसरे यांनी सांगितले.